Maharashtra Flood: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीची मोठी घोषणा; आमदार-खासदार देणार 1 महिन्याचा पगार

NCP MP Mla Donate One Month Salary To Farmers: मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षाचे सर्व मंत्री शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत. प्रत्येक नेता आपला एक महिन्याचा पगार शेतकऱ्यांना दिणार आहे.
NCP MP Mla  Donate One Month Salary To Farmers
NCP leaders to donate one month’s salary to support flood-affected farmers in Maharashtra.
Published On
Summary
  • अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय.

  • राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला.

  • सर्व आमदार-खासदार एका महिन्याचा पगार मदतीसाठी देणार आहेत.

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. शेतातील पिके पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं बळीराजाच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा लागल्या आहेत. बळीराजाचे हेच अश्रू पुसण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सरसावलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले आहेत. सर्व आमदार आणि खासदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिलीय.

NCP MP Mla  Donate One Month Salary To Farmers
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर वीज निर्मिती; देशातील पहिला प्रयोग; किती मेगावॅटची होणार निर्मिती, जाणून घ्या

महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. याआधी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही आपला १ महिन्याचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचे जाहीर केलं होतं. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच सर्व आमदार, खासदारांना तशा सूचना देण्यात आल्यात. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालंय.

NCP MP Mla  Donate One Month Salary To Farmers
Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचं असल्याचं तटकरे यांनी मदतीची घोषणा करताना सांगितलं. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी पूरग्रस्त भागात भेट दिली. सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट दिलीय. स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत. अजित पवार यांनी आज पीडित नागरिकांशी संवाद साधला.

सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिलेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरेंनी सांगितलं. पक्षाच्या या एकत्रित उपक्रमामुळे पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान एका आमदाराला अंदाजे अडीच लाख रुपयांचा पगार मिळत असतो. तर खासदारांना एक लाख रुपये पगार मिळत असतो. यात इतर मिळणारे भत्तेदेखील दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com