Bharti Bhagat Passed In SSC Exam 2023, Nagar News
Bharti Bhagat Passed In SSC Exam 2023, Nagar News saam tv
महाराष्ट्र

SSC Result 2023 : वयाच्या ५४ व्या वर्षी दहावीत मिळविले ५४ टक्के, वाचा भगत आजींची Success Story

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Nagar News : एखादी गोष्ट साध्य करायचीच असे ठरवलं तर कोणताही अडथळा पार करून माणूस जिद्दीच्या जोरावर काहीही करू शकतो. याचं जिद्दीच्या जोरावर नगरच्या भारती भगत (bharti bhagat) या 54 वर्षीय महिलेने इयत्ता दहावीत ५४ टक्के गुण (10th ssc result 2023) प्राप्त करुन आपले शिक्षणाचे स्वप्न पूर्ण केले. यामुळे भगत यांचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. (Maharashtra News)

भारती भगत यांचं लग्न वयाच्या अठराव्या वर्षी झाले. त्यामुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. घरची परिस्थिती जेम तेम असल्यामुळे सातवीपर्यंत शिक्षण झाले होते. लग्न झाल्यानंतर घर संसार मुले यांच्यात गुंतल्यांमुळे शिक्षण अपुर्णच राहिले.

आपले शिक्षण पूर्ण करायची जिद्द भारती यांच्या मनामध्ये कायम होती. घर संसार सांभाळत असताना मुलं मोठे झाल्यानंतर आठवी आणि नववीची परीक्षा त्यांनी पास केली होती. मात्र दहावीपर्यंत शिक्षण करायचे ही जिद्द मनामध्ये कायम होती.

अखेर सर्व सुरळीत झाल्यानंतर मुलं मुली, सुना आणि पतीने शिक्षण पूर्ण करण्यासाठी भारती भगत यांना प्रोत्साहन दिल्यामुळे वयाच्या ५४ व्यां वर्षी त्यांनी दहावीची परीक्षा दिली. या परिक्षेत त्यांनी 54 टक्के गुण प्राप्त केले. यामध्ये त्यांना घरातील सर्व सदस्यांसह शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांचा आणि त्यांच्या बरोबर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची मोठी साथ लाभली.

अपयश आले तर खचू नका

दहावी पास झाल्यानंतर आता पुढील शिक्षण घेण्याचाही मानस भारती भगत यांचा असून दहावी मध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी सल्ला दिला आहे. शिक्षणाला वय नसते जिद्द मनात ठेवली तर शिक्षण पूर्ण होऊ शकते खचून जाऊ नका. कधी ना कधी यश प्राप्तच होतेच, त्यामुळे आत्महत्या सारखा विचाराही मनात आणू नका आणि शिकत रहा असा मोलाचा सल्ला भारती भगत यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राहुल गांधी यांच्या पुण्यातील सभेच्या वेळेत बदल, सभास्थळी ६.३० वाजता येणार

Share Market Today : शेअर बाजारात मोठी पडझड; सेन्सेक्स १४०० अंकानी घसरला, झटक्यात गुंतवणूकदारांचे ३ कोटी बुडाले

Godrej Family Tree : गोदरेज समुहात विभाजन, आता कोण सांभाळणार व्यवसाय? वाटणीत कोणाला काय मिळालं?

Amit Shah: उद्धव ठाकरे नकली सेनेचे अध्यक्ष, बाळासाहेबांचे नाव घेऊ नये; अमित शहांची टीका

Sanjana Sanghi: संजनाच्या सौंदर्याचा जलवा; हटके लूकने वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT