Yavatmal News : ध्येय वेडा प्रवास ! अडीच फूट उंचीची मोनिका लाेखंडे ठरतेय चर्चेचा विषय

उन्हाळी परीक्षा सध्या सुरू झाल्या असून या परीक्षेला ती परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहे.
monica lokhande, Yavatmal News,
monica lokhande, Yavatmal News, saam tv

- संजय राठोड

Yavatmal News : आकांक्षा पुढे गगन ठेंगणे असे म्हणतात पण यवतमाळच्या उमरखेड येथील अडीच फूट उंची असलेल्या मोनिकाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची परीक्षा देऊन पदवी घेण्याचे मोठे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्याचा अनुभव विद्यापीठाच्या सुरू असलेल्या उन्हाळी परीक्षेच्या दरम्यान गोसी गावंडे महाविद्यालयाच्या अभ्यास केंद्रावर पहावयास मिळाला. (Maharashtra News)

monica lokhande, Yavatmal News,
Success Story : कडू कारल्याची गोड कहाणी; मावळातील शेतक-याने एक एकरातून कमाविले साडेतीन लाख

उमरखेड (yavatmal) तालुक्यातील मोहदरी येथील निवासी शंकर लोखंडे व पंचशीला लोखंडे यांची कन्या मोनिका ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बीए प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तिचे वय 22 वर्ष असून उंची मात्र अडीच फूट एवढी आहे. उंची कमी असली तरी शिक्षणाचे ध्येय तिला स्वस्थ बसू देत नव्हते म्हणून तिने मुक्त विद्यापीठात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला.

उन्हाळी परीक्षा सध्या सुरू झाल्या असून या परीक्षेला ती परीक्षार्थी म्हणून सामोरे जात आहे. वडिलांचे शिक्षण कमी असल्याने त्यांना पुणे येथे एका कंपनीत सेक्युरिटी गार्ड म्हणून खाजगी नोकरी करावी लागते. घरीही कोरडवाहू जमीन फक्त अडीच एकर त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी वडिलांचे परिश्रम आणि आई सूतगिरणी मध्ये रोज मजुरीवर करत असलेली मेहनत मोनिका आज पर्यंत पाहत आली आहे.

monica lokhande, Yavatmal News,
Shivrajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळयात यंदा 'या' कार्यक्रमांचे आयाेजन; शिरकाई देवी परिसर हर हर महादेवने दुमदुमला

शंकर लोखंडे यांना दोन मुले आणि दोन मुली असून विकास आणि आकाश नागपूर येथे राहून उदरनिर्वाह करतात विशेष म्हणजे तेही कलाकार आहेत. चित्रपट सृष्टीत त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे तर शालू ही मुलगी विवाहित आहे.

आता मोनिका घरी असून तिच्या शिक्षणाच्या जिद्दीपुढे वडिलांनी शिक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. मोनिका लोखंडेची उंची कमी असल्यामुळे अनेक नागरिकांनी परीक्षार्थी तिच्याकडे कुतूहलाने बघतात.

monica lokhande, Yavatmal News,
ICSE Board 10th Result 2023 : डोंबिवलीच्या रुद्र मुकादम देशात दुसरा, शिक्षकांनी सांगितलं यशाचे गमक

उंची कमी असून देखील शिक्षणाचे ध्येय असल्यामुळे तिच्यासाठी हे नवखे नाही. परीक्षा केंद्राकडून व्यवस्था मोनिका लोखंडेची उंची पाहता मोठ्या बेंचवर बसून तिला पेपर सोडविणे कठीण जात असल्यामुळे गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय परीक्षा केंद्राच्या वतीने तिच्यासाठी लहान बेंचची व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती प्रा. बी. यु. लाभशेटवार यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com