
Sahakar Shiromani Vasantrao Kale Sahakari Sakhar Karkhana Election News : सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या निवडणूकीसाठी आज (गुरुवार) राष्ट्रवादीचे अभिजीत पाटील (ncp abhijeet patil) गटाने श्री. पाटील आणि प्रा. बी.पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरले. या कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने कल्याणराव काळे (kalyanrao kale) गट, दिपक पवार (deepak pawar) गट तसेच अभिजीत पाटील यांचा गट अशी तिरंगी लढत हाेण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp) अंतर्गत फूट पडल्याची जाेरदार तालुक्यासह साेलापूर (solapur) जिल्ह्यात सुरु झाली आहे. (Maharashtra News)
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी चुरस निर्माण झाली आहे. या कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे गटाने मंगळवारी, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दिपक पवार गटाने बुधवारी उमेदवारी अर्ज भरले. या दाेन्ही गटातने शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर आज (गुरुवार) राष्ट्रवादीचे अभिजित पाटील आणि प्रा. बी.पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादीचे अभिजित पाटील आणि प्रा. बी.पी. रोंगे यांच्या गटाच्या 36 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दरम्यान या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस हाेता. त्यामुळे आजच्या दिवशी विक्रमी अर्ज दाखल झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील कल्याण काळे यांच्या गटापुढे राष्ट्रवादी मधीलच अभिजित पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी मधील वर्चस्व वाद यामुळे चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दिपक पवार यांनी बंड केल्या नंतर आता अभिजीत पाटील यांनी ही काळे यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.