Tulja Bhavani Mandir : भाविकांनाे! या कपड्यांवर तुळजाभवानी मंदिर परिसरात बंदी; काय आहे कारण... (पाहा व्हिडिओ)

नव्या नियमांचे भाविकांसह पूजा-यांनी पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
tuljapur news, tuljabhavani temple, dress code
tuljapur news, tuljabhavani temple, dress codesaam tv
Published On

- कैलास चाैधरी

Tuljapur News : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने ड्रेस काेड शिवाय मंदिरात येणा-या पूजा-यांना बंदी घालण्याची ताकीद दिली आहे. काही पूजारी नियमांचे उल्लंघन करीत जीन्स आणि शर्ट परिधान करुन मंदिर परिसरात वावरत असल्याने संस्थानने तातडीने हा निर्णय घेतला. या निर्णयाची प्रत संस्थानने नाेटीस बाेर्डवर देखील लावली आहे. दरम्यान भाविकांनी देखील हाफ पॅन्ट, बर्मुडा असा पेहराव करुन मंदिरात प्रवेश करु नये अशा स्वरुपाचा फलक श्री तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Temple) परिसरात संस्थानने लावला आहे (Maharashtra News)

tuljapur news, tuljabhavani temple, dress code
Police Bharti चा निकाल लागला अन् अख्ख गाव नाच नाच नाचलं, पहिल्यांदाच गावातील युवक बनला पाेलीस

श्री तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांना ड्रेस कोड शिवाय प्रवेश बंद करण्यात आला आहे. तरी काही पुजारी तुळजाभवानी मंदिर परिसरात जीन्स आणि शर्ट घालून फिरत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले.

याप्रकरणी तुळजापूर मंदिर प्रशासनाने एक नोटीस काढली आहे. ही नोटीस मंदिर परिसरातील भितींवरती लावण्यात आल्या आहेत. यामध्ये पुजाऱ्यांनी ड्रेस कोड शिवाय मंदिरात प्रवेश करू नये अन्यथा देऊळ कवायत कायदा (निजाम कालीन कायदा) नुसार कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मंदिरातील दर्शन मंडपाच्या तिसऱ्या मजल्यावर भाविकांशिवाय पुजाऱ्यांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

tuljapur news, tuljabhavani temple, dress code
ICSE Board 10th Result 2023 : डोंबिवलीच्या रुद्र मुकादम देशात दुसरा, शिक्षकांनी सांगितलं यशाचे गमक

दरम्यान भाविकांसाठी तुळजाभवानी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संस्कृती संदर्भात फलक लावण्यात आले आहेत. यामध्ये अंगप्रदर्शन करणारे व वेस्टर्न कपडे घालणाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे.

या फलकांवर अंगप्रदर्शन, उत्तेजक असभ्य अशोभनीय वस्ञधारी हाफ पॅन्ट, बर्मुडाधारकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही (western outfit banned in tuljabhavani mandir) असे म्हटलं आहे. तसेच भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com