भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडारा शहरातही बॅडमिंटन खेळत असताना सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बॅडमिंटन कोर्टवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भंडारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा स्टेडियमवर ही घटना घडली. त्यानंतर, तातडीने त्यांना उपचारासाठी डॉ. झंवर यांच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांकडून त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
बाजीराव चिंधालोरे (वय ६०) असं मृत सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकांचं नावं आहे. विशेष म्हणजे नुकतेच त्यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला होता. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्याला व्यस्त करण्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर जायचे आणि बॅडमिंटन खेळायचे. मात्र, आज अचानक खेळता-खेळता ते खाली कोसळले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. भंडारा शहरातील शिवाजी महाराज स्टेडियमवर ही दुर्घटना घडली असून ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
रायगडावरून परतणाऱ्या शिवप्रेमींचं वाहन उलटलं
दरम्यान, किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगडावरील हाच सोहळा आटोपून परतीचा प्रवास करणाऱ्या शिवप्रेमींच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. माणगावजवळील बोरवाडी गावाच्या हद्दीत अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात शिवप्रेमी गंभीर जखमी झाले आहेत.
शिवराज्याभिषेकाला संपूर्ण महाराष्ट्रातून शिवप्रेमी येत असतात. या सोहळ्यामागे अनेकांच्या वेगवेगळ्या भावना असतात. यंदाही ३५२ व्या शिवराज्याभिषेकाला किल्ले रायगडावर हजारो शिवप्रेमी आले होते. रायगडावरील हा शिवराज्यभिषेकाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर शिवप्रेमी परतीच्या मार्गावर निघाले.रायगडावरील हाच शिवराज्यभिषेक सोहळा आटोपून घरी परतणाऱ्या शिवप्रेमींच्या एका वाहनाचा अपघात झाला. बोरवाडी गावाजवळ या शिवप्रेमींच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन शिवप्रेमींना गंभीर दुखापत झाली आहे. तर दोन शिवप्रेमी किरकोळ जखमी झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.