
इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक या प्रकल्पाला भारतात GMPCS लायसन्स मिळालं आहे. त्यामुळे देशात सॅटलाईट आधारे इंटरनेट सेवा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परंतू कंपनीला लागलीच सेवा लाँच करता येणार नाही. स्टारलिंक भारतात सॅटेलाईट इंटरनेटसाठी सरकारी लायसन्स मिळविणारी तिसरी कंपनी ठरली आहे. भारतात डोंगर, पर्वत दऱ्या खोऱ्यातील अतिदुर्गम भागातही आता थेट उपग्रहाद्वारे फूलस्पीड नेटवर्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या स्टारलिंक सॅटेलाईटचे प्लॅन भारतीयांना परवडणार का? असा सवाल आता केला जात आहे.
एकीकडे इलॉन मस्क यांनी भारतात दिग्गज जिओ नेटवर्क कंपनी असताना स्टारलिंक सॅटेलाईट नेटवर्क मार्केटमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यातच स्टारलिंकला लेटर ऑफ इंटेंट मिळालं होतं. आता स्टारलिंकला सरकारने GMPCS लायसन्स दिलं आहे. लायसन्स मिळवल्यानंतर आता स्टारलिंक समोर आता एक आव्हान आणखी आहे. कंपनीला इन-स्पेस कडून अंतिम मंजूरी मिळणं बाकी आहे. ही मंजूरी मिळाली की भारतातील लोक सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सेवा मिळवू शकणार आहेत. परंतू ही शेवटची पायरी पूर्ण करण्यास नेमका किती वेळ लागणार याचा उलगडा झालेला नाही.
विशेष म्हणजे भारतात स्टारलिंकला परवाना मिळण्याआधी दोन कंपन्यांना हे लायसन्स मिळालेलं आहे. एक आहे ऑनवेब आणि दुसरी दिग्गज रिलायन्स यांनी आधीच डाव साधला आहे. त्यामुळे स्टारलिंक हे लायसन्स मिळविणारी तिसरी कंपनी ठरली आहे. हे लायसन्स मिळाले की भारतातही उपग्रहांच्याद्वारे नेटवर्क पुरविण्यात स्पर्धा लागणार आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना स्वस्तात सॅटेलाईट इंटरनेट मिळेल असे म्हटले जात आहे. स्टारलिंक कंपनीची सेवा सध्या १०० हून अधिक देशात आहे. या कंपनीचा उद्देश्य लेटेंसी ब्रॉडबँडद्वारे वेगवान इंटरनेट सर्व्हीस उपलब्ध करणं हा आहे.
सोशल माध्यमांवर आलेल्या बातम्यांनुसार, भारतात स्टारलिंक प्रमोशनल ऑफरनुसार १० डॉलर (सुमारे ८४० रुपये) मध्ये अनलिमिटेड डेटावाला प्लान्स विकू शकतात असं म्हटलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.