माकडं घरात घुसली, लेकरात जीव अडकला, बापाने कुऱ्हाड मारुन फेकली; डोळ्यासमोर दीड वर्षांच्या चिमुरड्याचा जीव गेला

Father Throws Axe Son Lost Life : माकडांना हुसकावण्यासाठी बापाने कुऱ्हाड फेकून मारली, पण दुर्दैवाने ती त्याच्याच मुलाच्या मानेवर बसली. या दुर्दैवी घटनेत दीड वर्षांचा मुलगा आरव याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद येथे हा प्रकार घडला.
Father Throws Axe Son Lost Life
Father Throws Axe Son Lost LifeSaam Tv News
Published On

लखनौ : माकडांना हुसकावण्यासाठी बापाने कुऱ्हाड फेकून मारली, पण दुर्दैवाने ती त्याच्याच मुलाच्या मानेवर बसली. या दुर्दैवी घटनेत दीड वर्षांचा मुलगा आरव याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद येथे हा प्रकार घडला. कुटुंबाने पोलिसांना माहिती न देता मुलाचं दफनविधी केलं. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद असल्याची चर्चा आहे. लखन सिंह असं पित्याचं नाव आहे, तर त्याच्या मेहुण्याने म्हणजेच आरवचा मामा जितेंद्र सिंह यांनी ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी या घटनेला केवळ अपघात मानलं आहे, पण या घटनेमुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

नेमकं काय घडलं?

दोन वर्षांचा आरव घरात खेळत असताना ही दुर्घटना घडली. काही माकडे घरात घुसली, यावेळी वडील लखन सिंह याला वाटलं की माकडे लहानग्या आरववर हल्ला करतील. त्यामुळे तो त्यांना हाकलण्यासाठी घराच्या छतावर गेला. त्याने माकडांना मारण्यासाठी लांबूनच कुऱ्हाड फेकली. दुर्दैवाने ती कुऱ्हाड आरवच्याच मानेवर बसली.

Father Throws Axe Son Lost Life
Shocking : उसने दिलेले पैसे परत मागितले, बॉयफ्रेंडची सटकली; गर्लफ्रेंडची हत्या करुन मृतदेह सूटकेसमध्ये भरला, अन्...

घटनेनंतर शौचालयाच्या भिंतीवर रक्ताचे डाग दिसले. आरवचा किंचाळण्याचा आवाज ऐकून कुटुंबीय घटनास्थळी धावले. त्यांनी त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यानंतर, कुटुंबाने पोलिसांना माहिती न देता मुलाला दफन केलं. त्यामुळे नातेवाईकांमध्ये संशय निर्माण झाला.

लखन सिंहचा मेहुणा जितेंद्र सिंह याने आरोप केला की हा अपघात नसून हत्या आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, लखनने पत्नी अनितासोबत झालेल्या भांडणात मुलाला मारलं. जितेंद्रने सांगितले, 'लखनचे अनितासोबत सोमवारी रात्री भांडण झालं. त्याने तिला खोलीत कोंडून मारलं. रात्री वाद शांत झाला, पण मंगळवारी सकाळी तो पुन्हा सुरू झाला. जेव्हा पती-पत्नी भांडत होते, तेव्हा आरव त्याचे आजोबा रामचंद्र यांच्या मांडीवर होता. भांडणादरम्यान, लखनने आरवला हिसकावून घेतले, कुऱ्हाड उचलली आणि त्याला मारलं.'

Father Throws Axe Son Lost Life
Accident News: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा चक्काचूर, अपघातामध्ये कलाकाराच्या वडिलांचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com