Accident News: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा चक्काचूर, अपघातामध्ये कलाकाराच्या वडिलांचा जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

Tragic Accident: चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाईन टॉम चाको शुक्रवारी सकाळी तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यात एका भीषण रस्ते अपघातात जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेत त्यांचे वडील सी.पी. चाको यांचा जागीच मृत्यू झाला.
Accident News
Accident NewsSaam
Published On

मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता शाईन टॉम चाको याच्या कारचा भीषण अपघात घडला आहे. या दुर्दैवी घटनेत त्याचे वडील सी.पी. चाको यांचा जागीच मृत्यू झाला. तर, इतर जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. तामिळनाडूतील धर्मपुरी जिल्ह्यातील पलाकोट्टईजवळ हा अपघात घडला आहे असून, त्यांची कार एका लॉरीशी धडकली. ही टक्कर इतकी भीषण होती की, कारचा चक्काचुर झाला. सध्या जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

मनोरमा न्यूजच्या वृत्तानुसार, सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चाको याच्या कारचा भीषण अपघात घडला. त्याची कार एका लॉरीशी धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात शाईनच्या वडिलांचा जागीच मृत्यू झाला. तर, कारमध्ये उपस्थित असलेले लोक गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर शाईन टॉम चाकोसह इतर जखमी सदस्यांना तातडीने पलाकोट्टई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Accident News
Pune News: बकरी ईद निमित्त वाहतुकीत बदल, पुण्यात कोणते मार्ग बंद? पर्यायी मार्गांची पोलिसांकडून लिस्ट जारी

अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अपघातस्थळाची भयानक अवस्था दिसून येत आहे. शाईन टॉम चाकोची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. रुग्णालयातील वैद्यकीय पथक सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

Accident News
Pune Tragedy: स्कार्फ बांधून लिफ्टमध्ये शिरली, २१ व्या मजला येताच..हिंजवडीतील अभियंता तरूणीचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल

शाईन टॉम चाको हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. या अपघाताच्या बातमीने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून, सोशल मीडियावर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com