
७ जून रोजी मुस्लिम बांधव बकरी ईद (ईद-उल-अधा) मोठ्या श्रद्धेने साजरी करणार आहेत. हा सण मुस्लिमांच्या धार्मिक इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिनानिमित्त राज्यभरात मुस्लिम बांधव नमाज पठण करतात. बकरी ईदला पुण्यातील गोळीबार मैदान परिसरातील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण होणार आहे. यावेळी वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांकडून काही उपाययोजना आखण्यात येणार आहे.
पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहतुकीत तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत. सकाळी ६ ते ११.३० या वेळेत काही मार्ग बंद राहणार असून, पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. याची नोंद नागरिकांनी घ्यावी, तसेच नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वाहतूक बंद असलेले मार्ग आणि पर्यायी व्यवस्था
१. भैरोबानाला ते गोळीबार मैदान मार्ग – सकाळी ६ ते ११.३० वाजेपर्यंत बंद
पर्यायी मार्ग:
स्वारगेटकडे जाणारी जड वाहने: प्रिन्स ऑफ वेल्स रस्त्याने → लुल्लानगर चौक
पुणे स्टेशनकडे जाणारी हलकी वाहने: एम्प्रेस गार्डन रस्ता
२. मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान
पर्यायी मार्ग:
बिशप स्कूल मार्ग / कमांड हॉस्पिटल मार्ग → नेपिअर रस्ता → सीडीओ चौक
३. सीडीओ चौक ते गोळीबार चौक – सकाळी ६ ते ११.३० वाजेपर्यंत बंद
पर्यायी मार्ग:
लुल्लानगरहून येणारी वाहने → सीडीओ चौकातून डावीकडे
खटाव बंगला चौक → उजवीकडे → नेपिअर रस्ता
४. सेव्हन लव्हज चौक ते गोळीबार मैदान
पर्यायी मार्ग:
सॅलिसबरी पार्क → सीडीओ चौक → भैरोबानाला
५. जुनी सोलापूर बाजार चौकी ते गोळीबार चौक
पर्यायी मार्ग:
खाणे मारुती चौक → पुलगेट डेपो → सोलापूर बाजार चौक → नेपिअर रस्ता → खटाव बंगला चौक / मम्मादेवी चौक
६. लुल्लानगर चौकातून गोळीबारकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद (एसटी, पीएमपी, मालवाहतूक)
पर्यायी मार्ग:
लुल्लानगर चौक → भैरोबानाला चौक किंवा गंगाधाम चौक
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
पोलिस प्रशासनाने नमाज पठणावेळी वाहतुकीसाठी आखलेले नियोजन पाळावे, अशी विनंती केली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.