Bhandara News Saam tv
महाराष्ट्र

Bhandara News : नाश्त्याच्या पोह्यांमध्ये मुंग्या आणि किडे आढळले; तुमसरमधील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार!

Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील काही तरुण रविवारी सुट्टीसाठी चंदपूर देवस्थानला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना ते नास्ता करण्यासाठी थांबले

Rajesh Sonwane

शुभम देशमुख

भंडारा : कुठे बाहेर गेलात तर नाश्ता बाहेरच केला पाहिजे. पण त्याच नाश्त्यात मुंग्या आणि किडे दिसले धक्काच बसेल, परंतु असा प्रकार भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सिहोरा येथील हॉटेल राजाभाई पोहेवाला येथे समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील तुमसर येथील काही तरुण रविवारी सुट्टीसाठी चंदपूर देवस्थानला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना ते नास्ता करण्यासाठी थांबले. याठिकाणी त्यांनी पोहे व डोसे मागवले. मात्र त्यांनी घेतलेल्या पोह्यांच्या प्लेटमध्ये लहान मुंग्या आणि किडे दिसून आले. याची माहिती त्यांनी हॉटेल मालकांना दिली. मात्र हॉटेल मालकांनी त्यांच्यासी हुज्जत घालत तुमच्या घरी किडे निघाले, तर फेकता का? असे उलट उत्तर दिले. 

सदरच्या प्रकारामुळे राजाभाई पोहेवाला हॉटेलमध्ये नागरिकांच्या जीवासी खेळ सुरू असल्याचे समोर येत आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून आता हॉटेलवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करण्याची गरज आहे; अशी मागणी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Star Fruit : आंबट समजून 'स्टार फ्रूट'कडे करताय दुर्लक्ष, ते हृदयासाठी गुणकारी; फायदे वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनाला यंदा विलंब; भरती-ओहोटी आणि भव्य मिरवणुका ठरल्या कारणीभूत

Saree Designs: महिलांसाठी पार्टीवेअर साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Gadchiroli Flood : गडचिरोलीत पावसाचा कहर! पर्लकोटा नदीला महापूर, भामरागड शहराला पुराचा वेढा; अनेक रस्ते पाण्याखाली

Face Care: उन्हामुळे चेहऱ्याची चमक गेली? 'या' घरच्या पद्धतीने ५ मिनिटांत त्वचा होईल ग्लोइंग

SCROLL FOR NEXT