Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा; १५ सप्टेंबरपर्यंत होणार वाटप

Nandurbar News : राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आनंदाचे शिधा देण्याची योजना राबवली जात आहे.
Nnaudrbar News
Nnaudrbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : रेशन कार्ड धारकांना राज्य सरकारकडून सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शंभर रुपयात आनंदाचा शिधा दिला जात असतो. आता काही दिवसांवर आलेल्या रक्षाबंधन व स्वतंत्र दिनानिमित्ताने शिधा वाटप केला जाणार असून नंदुरबार जिल्ह्यातील दोन लाख ८४ हजार ९६० कुटुंबाना हा शिधा मिळणार आहे. 

Nnaudrbar News
Ration Shop : मृत व्यक्तींच्या नावाने धान्याची उचल; भंडारा जिल्ह्यातील रेशन दुकानदाराचा प्रताप

राज्य शासनाच्या वतीने गोरगरीब आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आनंदाचे शिधा देण्याची योजना राबवली जात आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या आत (Nnaudrbar News) नंदुरबार जिल्ह्यातील दोन लाख ८४ हजार ९६० कुटुंबांसाठी आनंदाचे शिधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कुटुंबांना सणाच्या वेळेस या किटमध्ये एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो सोयाबीन तेल व एक किलो चणाडाळ या वस्तूंच्या पाकीट मिळणार आहे.

Nnaudrbar News
KDMC News : केडीएमसीच्या २७ गावांतील कर्मचाऱ्यांचे काम बंद; मुख्यलयावर मोर्चा काढत दिला इशारा

१५ सप्टेंबरपर्यंत वाटप 

नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थी असलेल्या दोन लाख ८४ हजार ९६० कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. अंत्योदय आणि प्राधान्यक्रम (Ration Card) रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत रेशन दुकानावर हे आनंदाचा शिधा किट उपलब्ध होणार आहे. यानंतर याच्या वाटपास सुरवात होऊन लाभार्थ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत सर्व कुटुंबांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com