Dhadgaon Nagarpanchayat : धडगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेसला धक्का; शिंदे गटाचा भगवा फडकला

Nandurbar News : धडगाव नगरपंचायतच्या प्रभाग १४ मध्ये काँग्रेसचे पक्षाचे नगरसेविका बिना पावरा यांनी आपला पदाचा राजीनामा दिला होता.
Dhadgaon Nagarpanchayat
Dhadgaon NagarpanchayatSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव नगरपंचायतीत प्रभाग क्रमांक १४ मध्ये निवडून आलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराने आपला पदाचा राजीनामा दिला होता. या नंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली. काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत शिंदे गटाचे ममता पावरा यांना ३५८ मते मिळाले असून त्यांनी ९३ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला.

Dhadgaon Nagarpanchayat
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार कुटुंबांना आनंदाचा शिधा; १५ सप्टेंबरपर्यंत होणार वाटप

धडगाव नगरपंचायतच्या प्रभाग १४ मध्ये काँग्रेसचे (Congress) पक्षाचे नगरसेविका गिरजा अंबाजी पावरा यांनी आपला पदाचा राजीनामा दिला होता. या नंतर त्या जागेवर पुन्हा पोट निवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेस उमेदवार बिना पावरा यांचा पराभव करत शिंदे गटाचे ममता पावरा यांना ३५८ मते मिळाली असून ९३ मतांनी त्यांचा दणदणीत विजयी झाला. यामुळे पुन्हा एकदा धडगाव नगरपंचायतीवर शिंदे गटाने आपला भगवा फडकवला आहे. शिंदे गटाच्या वतीने फटाके फोडत पेढे भरवत विजय उत्सव साजरा करण्यात आला. 

Dhadgaon Nagarpanchayat
KDMC News : केडीएमसीच्या २७ गावांतील कर्मचाऱ्यांचे काम बंद; मुख्यलयावर मोर्चा काढत दिला इशारा

विधानसभा प्रमुख विजयसिंग पराडके यांचे वर्चस्व कायम

धडगाव नगरपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता असून धडगाव, अक्कलकुवा (Akkalkuwa) विधानसभा प्रमुख विजयसिंह पराडके यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ज्याप्रमाणे नगरपंचायत आमच्या ताब्यात आहे. योग्य रीतीने नगरपंचायतीचे काम सुरू असून येणाऱ्या विधानसभेत देखील याच पद्धतीने आमचा विजय निश्चित राहणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे अक्कलकुवा धडगाव विधानसभा संपर्कप्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com