beed shivajinagar police charged pankaja munde supporters  Saam Digital
महाराष्ट्र

पंकजा मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल, जाणून घ्या कारण

विनोद जिरे

एकात्मतेला बाधक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत बीड जिल्ह्यात सुमारे 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वणवे यांच्यासह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विषयी समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली हाेती. याच्या निषेर्धात बीड येथील शिरूर कासार येथे सकल ओबीसी बांधव तथा मुंडे समर्थकांच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता.

यादरम्यान त्या ठिकाणी रॅली देखील काढण्यात आली होती. याच रॅलीमध्ये दशरथ वनवे, रामराव खेडकर, रामदास बडे यांच्यासह 15 ते 20 जणांनी एकात्मतेला बाधक वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांच्या विराेधात पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil: शरद पवारांचे मुख्यमंत्री जयंत पाटील? पाटलांवर येणार मोठी जबाबदारी

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT