sambhajinagar mahapalika issued notice to 27 buildning owners to demolished it know the reason
sambhajinagar mahapalika issued notice to 27 buildning owners to demolished it know the reasonSaam Digital

संभाजीनगर महापालिकेने धाेकादायक इमारतींवर फिरवला बुलडाेझर;212 अतिक्रमणे रडारवर

sambhajinagar mahapalika issued notice to 27 buildning owners to demolished it know the reason : कामगार चौक, रांजणगाव फाटा, कोलगेट चौक या ठिकाणीच्या अवैध बांधकामांवर लवकरच प्रशासनाचा हातोडा पडणार आहे.

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध भागात एक दोन नव्हे तर तब्बल 27 जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या इमारती धोकादायक असल्याची माहिती महापालिकेच्या सर्वक्षणातून समोर आली आहे. महापालिकेने संबंधित इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. आगामी तीन दिवसांत स्वतःहून इमारत उतरवून घ्याव्यात अन्यथा बुलडोजर फिरवणार असल्याचा कडक इशारा दिला आहे.

दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका प्रशासनाकडून जुने बांधकाम असलेल्या धोकादायक इमारतींचा नोटीस बजावण्याची कागदोपत्री खेळ केले जायचे. मात्र यंदा पालिका प्रशासन चांगलंच ॲक्शन मोडवर आली आहे. धोकादायक इमारतीचा सर्व्हे करून त्यांच्या पाडापाडीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या इमारती आता पाडल्या जाणार आहे. दरम्यान आतापर्यंत पालिका प्रशासनाने दोन धोकादायक इमारती पाडल्या आहेत.

sambhajinagar mahapalika issued notice to 27 buildning owners to demolished it know the reason
Rain Hits Latur: पावसाचा धुमाकूळ, लातूरचे जनजीवन विस्कळीत;शिरूर अनंतपाळ- उदगीर, लातूर- उदगीर मार्गावरील वाहतुक ठप्प

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी भागातील बजाज नगर परिसरात महाराणा प्रताप चौकात असणारी आणि रस्त्याच्या कामाला अडथळा आणणारे अवैधरित्या केलेले बांधकाम एमआयडीसी प्रशासनाच्या अतिक्रमण पथकाने जमीनदोस्त करत कारवाईचा बडगा सुरू केलाय. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूचे बांधकाम पाडले जात असताना दुसऱ्या बाजूने फुटपाथ वरील अतिक्रमाणांकडे प्रशासन डोळे झाक करीत असल्याचा आरोप देखील व्यावसायिक आणि नागरिकांतून होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

sambhajinagar mahapalika issued notice to 27 buildning owners to demolished it know the reason
Somatane Toll Plaza: स्थानिकांसाठी सोमाटणे नाका टोलमुक्त आश्वासन हवेत, नागरिक संतप्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com