सांगली: PWD वर स्थानिकांचा राेष, मिरज मालगावचा संपर्क तुटला, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Rain Hits Sangli: सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम संथ गतीने सुरू ठेवल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुलाची उंची न वाढवता हा पूल केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
rain hits sangli miraj malgaon road disrupts traffic diverted from takli
rain hits sangli miraj malgaon road disrupts traffic diverted from takli Saam Digital

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे काम सुरू असलेला पुल वाहून गेला. परिणामी मिरज मालगाव तसेच त्यामार्गावरील गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान सध्या टाकळी कडून पर्यायी मार्गे वाहतूक सुरू आहे.

मिरज तालुक्यामध्ये गेले दोन ते तीन दिवस झाले दमदार पाऊस झाला. या पावसाने शहरातील मिरज ओढ्याला पूर आला. मिरज मालगाव रोडवर सुरू असलेला पुल पाण्याचा प्रवाहात वाहून गेला. पुलावरून पाणी जात असल्याने मिरज मलगाव वाहतूक ठप्प झाली. तसेच पुढील गावाचा संपर्क तुटला.

rain hits sangli miraj malgaon road disrupts traffic diverted from takli
Hatkanangale Election Result: हातकणंगलेत का झाला पराभव? राजू शेट्टींनी स्वत:च सांगितले (पाहा व्हिडिओ)

मिरज ओढ्या वरील निकृष्ट दर्जाचे नालेसफाईचे काम त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात झालेल्या पावसाने शहरातील ओढे ओसंडून वाहत आहेत. नाल्यावरील अतिक्रमण वाढल्याने याचा नागरिकांना त्रास होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे काम संथ गतीने सुरू ठेवल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुलाची उंची न वाढवता हा पूल केला जात असल्याने भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

rain hits sangli miraj malgaon road disrupts traffic diverted from takli
अकाेला सराफ बाजारात थरार! भरदिवसा तरुणीवर जीवघेणा हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com