Sambhajinagar Water Supply: संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक काेलमडणार,जाणून घ्या कारण

water supply pipeline busted in sambhajinagar: संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात जलवाहिनी फुटल्याने पाण्याच्या दाबाने डांबरी रस्ताही खचून गेला. यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण झाला.
water supply pipeline busted in sambhajinagar
water supply pipeline busted in sambhajinagarSaam Digital

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी 1400 मिली मीटर व्यासाची जलवाहिनी आज (साेमवार) फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असणाऱ्या उड्डाणपूला खालील जलवाहिनी फुटल्याने आसपासच्या दुकानातही पाणी शिरले. दरम्यान जलवाहिनी फुटल्याने संभाजीनगर शहराचा पाणीपूरवठा 2 दिवस विस्कळीत हाेण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

गेल्या दाेन तीन दिवसांपूर्वी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातला वीजपुरवठा खंडित झाल्याने शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. आता पुन्हा एकदा जलवाहिनी फुटल्याने संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम हाेणार आहे.

water supply pipeline busted in sambhajinagar
एकनाथ खडसेंच्या दिल्ली दाै-यावर अनिल पाटील म्हणतात, बेगानी शादी में... (पाहा व्हिडिओ)

संभाजीनगर शहरात जलवाहिन्या फुटल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. प्रशासनाकडून जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

water supply pipeline busted in sambhajinagar
Gondia Accident : गोंदिया- कोहमारा मार्गावर बसला अपघात, 12 प्रवासी जखमी, 2 गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com