Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Assembly Election: विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात मनोज जरांगे मोट बांधत आहेत. भाजपचा सुपडा साफ करण्यासाठी त्यांनी प्लॉनिंग सुरू केलीय.
Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झालेत. तर जरांगेंनी विधानसभेसाठीच्या आठरा पगड जातीच्या इच्छूकांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर जरांगेंनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून महायुतीचं टेंशन वाढवणारा डाव टाकलाय. एवढंच नाही तर मराठे भाजपचा राजकीय एन्काऊंटर करणार असल्याचा इशाराच मनोज जरांगेंनी दिलाय.तर भाजपनेही जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय

एकीकडे भाजपने ओबीसी समुहाला एकत्र करत विविध जातसमुहांचे मेळावे घ्यायला सुरुवात केलीय. मायक्रो ओबीसींना आपल्याकडे वळवण्याची रणनीती भाजपने आखलीय. तर दुसरीकडे मनोज जरांगेंनीही सर्व जात आणि धर्माच्या समुहांना एकत्रित करत महायुतीला मात देण्याची रणनीती आखलीय. त्याचीच झलक इच्छूकांच्या बैठकीमध्ये पाहायला मिळाली. पाहूयात.जरांगेंची नेमकी रणनीती काय आहे?

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?
Kolhapur Politics: चंदगडच्या उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

जरांगे करणार भाजपचा एन्काऊंटर?

1) मराठा, दलित, मुस्लीम आणि आदिवासी समाजाची मोट बांधणार

2)ओबीसीतील छोट्या जात समुहांना एकत्र करत उमेदवारी देण्याची शक्यता

3) सर्व जातींची मोट बांधून जरांगे भाजपचं गणित बिघडवणार

4) लोकसभेप्रमाणेच विधानसभेला भाजपचा सुफडा साफ करण्यासाठी रणनीती आखणार

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?
Assembly Election: पुण्यात भाजपच्या सर्व आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे काय?

मनोज जरांगेंच्या बैठकीमध्ये उमेदवार निश्चितीबाबत चर्चा झाली नाही. मात्र 20 ऑक्टोबरच्या बैठकीत लढायचं की पाडायचं हे ठरवणार असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय. मात्र जरांगेंनी थेट भाजपचा राजकीय एन्काऊंटर करण्याचा इशारा दिल्याने जरांगेंच्या निशाण्यावर फडणवीस असल्याचं स्पष्ट झालंय.. त्यामुळे 20 ऑक्टोबरच्या बैठकीकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com