Assembly Election: पुण्यात भाजपच्या सर्व आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे काय?

Pune Assembly Election : पुण्यात विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून पुण्यात बैठकांचं सत्र सुरू आहे.
Assembly Election: पुण्यात भाजपच्या सर्व आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे काय?
BJP saam tv
Published On

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. पुण्यात मात्र भाजपच्या सर्व आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मुंबईत भाकरी फिरवली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

भाजपच्या विद्यमान आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून पुण्यात भाजपचे ५ विद्यमान आमदार आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर ४ जणांच्या नावावर मोहोर लागण्याची शक्यता आहे. कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला या पाचही विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पसंती मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत पूणे शहरातील सर्व आमदारांची नावे असण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ शिरोळे, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर आणि सुनील कांबळे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे.

Assembly Election: पुण्यात भाजपच्या सर्व आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे काय?
Maharashtra Assembly Election : भाजप - अजित पवार गटाचे अनेक नेते संपर्कात, रोहित पवार यांच्या दाव्याने वाढलं महायुतीचं टेन्शन?

तर मुंबईत मात्र भाकरी फिरवली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान उमेदवारांना तिकीट नाकारले जाण्याची शक्यता आहे. यापैकी सर्वात मोठा धक्का भाजपचे घाटकोपर पश्चिम मतदारसंघातील आमदार राम कदम यांना बसणार आहे. सुमार कामगिरीमुळे राम कदम यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. राम कदम हा भाजपचा प्रसारमाध्यमांवर सातत्याने झळकणारा चेहरा. मात्र तरीही त्यांचना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुमार कामगिरीमुळे त्यांना यंदा उमेदवारी नाकरलं जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे.

Assembly Election: पुण्यात भाजपच्या सर्व आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे काय?
Maharashtra Politics: हरियाणात घडलं ते राज्यातही घडणार? महायुतीची सरशी, मविआला फटका? वाचा स्पेशल रिपोर्ट

राम कदम हे २००९ साली राज ठाकरे यांच्या मनसेकडून निवडणूक लढवून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यानंतर २०१४ मध्ये राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ आणि २०१९ मध्ये राम कदम सहजपणे निवडून आले होते. दहीहंडी, रक्षाबंधन सोहळा आणि धार्मिक स्थळांच्या यात्रांमुळे राम कदम हे सातत्याने चर्चेत असतात.

भाजपकडून मुंबईत राम कदम यांच्यासह पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. भाजपच्या जुन्या नेत्यांचे विधानसभेत पुनर्वसन केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. वर्सोवा विधानसभेत विद्यमान आमदार भारती लव्हेकर यांच्याऐवजी संजय पाण्डेय यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर घाटकोपरमध्ये राम कदम यांचा पत्ता कट झाल्यास महायुतीचा चेहरा कोण असेल. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. सायन मतदारसंघात कॅप्टन तमिल सेल्वन यांच्याऐवजी राजश्री शिरवडकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com