Kolhapur Politics: चंदगडच्या उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपचा दावा

Kolhapur Election: कोल्हापूरमधील चंदगडमधील दावेदारीमुळे राजकारणाच्या वर्तुळात या मतदारसंघाची चर्चा घडू लागलीय. येथील उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच सुरू झालीय. राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपने दावा केलाय.
Kolhapur Politics:  चंदगडच्या उमेदवारीवरुन महायुतीत रस्सीखेच; राष्ट्रवादीच्या मतदारसंघावर भाजपचा दावा
Published On

राज्यात विधानसभेचं महाभारत सुरु झालंय... त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये महायुतीतच उमेदवारीवरून वाद पेटलाय... चंदगडमधील सद्यस्थिती कशी आहे? कोणत्या मुद्द्यावर वाद पेटलाय? त्याबरोबरच महायुतीतच कोणी दंड थोपटलेत? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

विधानसभा निवडणूकीचं बिगूल वाजलं असतानाच आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचं वातावरण चांगलंच तापलंय... अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश पाटील विद्यमान आमदार असताना भाजपच्या नेत्यांनी शिवाजी पाटलांची उमेदवारी घोषित करून दादांविरोधातच रणशिंग फुंकलंय... तर भाजपने चंदगडची उमेदवारी घोषित केल्याने हसन मुश्रीफांनी नाराजी व्यक्त केलीय.

3 लाख 47 हजार मतदारसंख्या असलेल्या चंदगडमध्ये राजकीय घमासान सुरु असलं तरी 2019 मध्ये चंदगड विधानसभेचं चित्रं कसं होतं? पाहूयात.

राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस - 55 हजार 558 मतं

शिवाजीराव पाटील, अपक्ष- 51 हजार 173 मतं

विनायक पाटील, वंचित बहुजन आघाडी- 43 हजार 973 मतं

संग्राम कुपेकर, शिवसेना- 33 हजार 215 मतं

2019 मध्ये चौरंगी लढतीत राजेश पाटलांचा अवघ्या 4 हजार मतांनी विजय झाला होता. मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीच्या शाहू छत्रपतींना 9 हजार मतांचं लीड मिळालं होतं. त्यामुळे चंदगडमध्ये महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय.. मात्र या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीतून कोण इच्छूक आहेत? पाहूयात.

1) राजेश पाटील, आमदार - राष्ट्रवादी (AP)

2) शिवाजी पाटील -भाजप

3) संग्राम कुपेकर - भाजप/ अपक्ष

4) नंदाताई बाभुळकर -राष्ट्रवादी (SP)

5) गोपाळराव पाटील - काँग्रेस

6) राजेंद्र गड्डेनवार - जनसुराज्य पार्टी

7) मानसिंग खराटे - अपक्ष

8) विनायक पाटील - अपक्ष

महाराष्ट्र, गोवा, आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या चंदगडमध्ये यंदा महायुती आणि महाविकास आघाडीत इच्छूकांची भाऊगर्दी झालीय.. त्यामुळे उमेदवार निश्चितीनंतर बंडखोरी थांबवणं हे महायुती आणि महाविकास आघाडीपुढे मोठं आव्हान असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com