Wadwani Bandh : पंकजा मुंडेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट; शिरूर कासार, परळीनंतर आज वडवणीत बंद

Wadwani bandh today : बीडमधील शिरूर कासारमध्ये शनिवारी आणि रविवारी परळी शहरामध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी बंद पुकारला होता. आज वडवणीत बंदच्या पार्श्वभूमीवर तगडा पाेलीस बंदाेबस्त आहे.
wadwani bandh today
wadwani bandh todaySaam Digital

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्ट केल्याने आज (साेमवार) बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात बंदचे आवाहन करण्यात आले हाेते. त्यानुसार वडवणी शहरातील व्यापाऱ्यांसह दुकानदारांनी त्यास मोठा प्रतिसाद दिला आहे. संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाऴण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यात एका युवकाने पंकजा मुंडेविषयी समाज माध्यमातून आक्षेपार्ह पाेस्ट केली. यामुळे तणाव निर्माण झाला हाेता. पाेलिसांनी वेळीच युवकावर गुन्हा दाखल करुन पंकजा मुंडे समर्थकांना शांततेचे आवाहन केले.

wadwani bandh today
Gondia Accident : गोंदिया- कोहमारा मार्गावर बसला अपघात, 12 प्रवासी जखमी, 2 गंभीर

दरम्यान सकल ओबीसी समाज तथा मुंडे समर्थकांकडून आज वडवणी शहर बंदचे आवाहन करण्यात आले हाेते. त्यास नागरिकांनी प्रतिसाद देत शहरात कडकडीत बंद पाळला आहे. पंकजा मुंडे सर्मथकांनी पाेलिसांना निवेदन देत दाेषींवर कारवाईची मागणी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

wadwani bandh today
उदयनराजेंना अश्रू अनावर, पत्नी दमयंतीराजेंनी सावरलं; नेमकं काय घडलं जलमंदिर पॅलेसमध्ये? VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com