Pathardi Bandh: पंकजा मुंडेंविषयी आक्षेर्पाह स्टेटस, पाथर्डीत आज कडकडीत बंद

pathardi bandh today : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बीड लाेकसभा मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमात स्टेटस ठेवले. तरी काहींनी त्यांची खिल्ली उडवली.
pathardi bandh today
pathardi bandh todaySaam Digital

- सुशील थाेरात

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत समाज माध्यमात आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथे तणाव निर्माण झाला होता. या प्रकाराच्या निषेर्धात आज (शुक्रवार) सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीने पाथर्डी बंदची हाक देण्यात आली हाेती. त्यास पाथर्डीकरांना उत्तम प्रतिसाद दिला. शहरातील सर्व दुकानदारांनी तसेच छाेट्या व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग नाेंदविला आहे.

अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील एका युवकाने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवले. या प्रकारानंतर तणाव निर्माण झाला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्याची जाेरदार मागणी केली.

pathardi bandh today
चर्चाच चर्चा! खासदार निलेश लंकेंच्या पत्नी विधानसभा निवडणूक लढणार?

मुंडे समर्थक शिरापूर येथील संबंधित तरुणाच्या घरावर जाब विचारण्यासाठी काल गेले हाेते. याची माहिती कळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठत प्रकरणावर कायदेशिर कारवाईची हमी दिली. त्यानंतर संबंधित घटना पाथर्डी पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने घेत आचारसंहिता भंग आणि स्टेटस ठेवून सामाजिक अशांतता निर्माण केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल केला. या प्रकाराचा निषेध म्हणून आज पार्थडीत बंद पाळण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

pathardi bandh today
Pune : ठेकेदार, कंत्राटदारांना सोबत घेऊन निवडणुका जिंकता येत नाहीत, भाजप पदाधिका-याची देवेंद्र फडणवीसांवर टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com