Beed Santosh Deshmukh Killed case Police found 15 videos Saam Tv News
महाराष्ट्र

Santosh Deshmukh : देशमुखांच्या मारेकऱ्यांची हैवानीयत, मृत्यूचा थरकाप उडवणारे १५ व्हिडीओ; देशमुखांचं विव्हळणंही कॅमेऱ्यात कैद

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुखांच्या क्रुर हत्येचे थरकाप उडवणारे व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागलेत...मात्र या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये...

Bharat Mohalkar

भरत मोहोळकर, साम टीव्ही

बीड : सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येची सुदर्शन घुलेने कबुली दिली. त्यानंतर आता मृत्यूचा थरकाप उडवणारे १५ व्हिडीओ आणि ८ फोटो महेश केदारच्या मोबाईलमधून समोर आलेत. सीआयडीचे प्रमुख अनिल गुजर यांनी २ ओप्पो आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ताब्यात घेतला होता. या मोबाईलचा फॉरेन्सिक अहवाल समोर आलाय. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय.

मारहाणीची क्रूर कहाणी 'साम'वर

पहिला व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 46 मिनिटं 6 सेकंद

संतोष देशमुखांना पाईप, वायर, लाथाबुक्क्यांनी मारहाण

दुसरा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 47 मिनिटं 2 सेकंद

शिवीगाळ करत संतोष देशमुखांची पॅन्ट काढतायत

तिसरा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 48 मिनिटं

दुसऱ्या आरोपीकडून वायरची मूठ तयार करुन मारहाण

चौथा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 51 मिनिटं 43 सेकंद

पाईपनं मारहाण करताना महेश केदारकडून शूटिंग, बाजूला सुदर्शन घुलेची गाडी दिसतेय

पाचवा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 52 मिनिटं 26 सेकंद

संतोष देशमुखांना मारहाण करताना, कॉलर पकडून बसवताना दिसतंय

सहावा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 53 मिनिटं 59 सेकंद

संतोष देशमुखांना तोंडावर आणि इतर ठिकाणी मारहाण

सातवा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 54 मिनिटं 22 सेकंद

तपकिरी रंगाच्या पाईपनं मारहाण करताना व्हिडिओ काढताना एक व्यक्ती

आठवा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 54 मिनिटं 32 सेकंद

संतोष देशमुखांना आरोपी बळजबरीनं काहीतरी विचारतायत

नववा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 55 मिनिटं 37 सेकंद

सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं म्हणायाला लावलं, देशमुखांच्या तोंडावर लघवी करताना दिसतंय

दहावा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 58 मिनिटं 56 सेकंद

देशमुखांच्या अंगावरील कपडे काढून अंडरवेअरवर बसवलं आणि पाईपनं मारहाण

अकरावा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 58 मिनिटं 56 सेकंद

जखमी देशमुखांना अंडरवेअरवर बसवून दुसरा व्यक्ती शूटिंग करतोय

बारावा व्हिडिओ

वेळ - 3 वाजून 59 मिनिटं 18 सेकंद

देशमुखांचे केस ओढून बोलण्यास लावून शूटिंग करतायत

तेरावा व्हिडिओ

वेळ - 5 वाजून 34 मिनिटं 5 सेकंद

देशमुखांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओजवळ झोपवल्याचं दिसतंय.

रक्ताचे डाग अससेले पॅन्ट घालताना दिसतायत

चौदावा व्हिडिओ

वेळ - 5 वाजून 35 मिनिटं 16 सेकंद

देशमुखांना उठवून बसवून शर्ट घालताना दिसतायत. त्याआधी फाटलेले, रक्तानं माखलेलं बनियन फेकून देताना दिसतायत

पंधरावा व्हिडिओ

वेळ - 5 वाजून 53 मिनिटं 52 सेकंद

यामध्ये एक व्यक्ती विव्हळतानाचा आवाज येतोय

सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारने देशमुखांच्या हत्येची कबुली दिली. एवढंच नाही तर कोर्टातील युक्तीवादानंतर स्कॉर्पिओतील १९ पुरावे आणि आता २ तास क्रुरपणे केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ समोर आलेत. मात्र ही हैवानीयत कुठून येते? या हैवानांना कायद्याचा धाक राहिला नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्यामुळे आता देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देऊन कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT