Disha Salian : 'या' सेलिब्रेटीच्या जबाबाने दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट, केला धक्कादायक खुलासा

Disha Salian Suicide Case : दिशा सालियान काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीच्या जाहिरातीशी थेट सबंधित असलेल्या मिलिंद सोमण आणि दिशा पटणीचा यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता.
Disha Salian death case Malvani police records statements
Disha Salian death case Malvani police records statementsSaam Tv News
Published On

मुंबई : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात सध्या वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल केली. त्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. मालवणी पोलिसांनी यापूर्वीच दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. या क्लोजर रिपोर्टमध्ये अत्यंत धक्कादायक खुलासे आहेत. पोलिसांनी आता दोन सेलिब्रेटींचा जबाब नोंदवला होता.

दिशा सालियान काम करत असलेल्या कॉर्नरस्टोन कंपनीच्या जाहिरातीशी थेट सबंधित असलेल्या मिलिंद सोमण आणि दिशा पटाणीचा यांचा जबाब मालवणी पोलिसांनी नोंदवला होता. दिशा पटाणी आणि मिलिंद सोमण यांनी कॉर्नरस्टोन या कंपनीशी दोन वेगवेगळ्या जाहिरातींसाठी करार केला होता. या दोन्ही सेलिब्रेटींशी संवाद करण्याची आणि बोलणी ठेवण्याची जबाबदारी दिशा सालियनवर होती. करारात नमूद नसलेल्या गोष्टी करायला सांगितल्या जात असताना दिशा पटाणीने नकार दिल्याने दिशा सालियान तणावात होती.

Disha Salian death case Malvani police records statements
Ladki Bahin Yojana : आयकर विभागाचा आळस, अर्ज पडताळणी रखडली; लाडकी बहिणींचं फावलं

मिलिंद सोमणने एका मोबाईल कंपनीची जाहिरात या कंपनीसोबत केली होती. मात्र करार संपल्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळे कंपनी अडचणीत आली होती. यावर त्या मोबाईल कंपनीने आक्षेप घेतला होता. करार संपुष्ठात आल्याने मी केलेलं ट्वीट डिलीट करणार नाही, अशी भूमिका सोमण यांनी घेतली होती. कॉर्नरस्टोन कंपनीशी सबंधित या दोन बाबींमुळे दिशा तणावात होती हेही एक कारण आहे.

दरम्यान, वडिलांच्या अफेअरबद्दलची माहिती, कंपनीच्या डील करण्यात अपयशी आणि काही आर्थिक बाबींच्या त्रासामुळे दिशा त्रस्त होती. म्हणून दिशाने आत्महत्या केल्याचा क्लोजर रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांचा निष्कर्ष आहे.

Disha Salian death case Malvani police records statements
MS Dhoni Stumping : नॉर्मल वाटलोय का.. धोनीची वाऱ्याहून वेगवान स्टंपिंग, Video व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com