बीड : उन्हाळ्यातील मार्च महिना सुरू असतानाच बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळाचे चित्र अधिक गडद बनत चालले आहे. (Beed) मार्च महिन्यातच पाणी टंचाईची दाहकता वाढल्याने जिल्ह्यातून तब्बल १४० गावांमधून टँकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे दाखल झाले आहेत. जिल्ह्यात बीड, गेवराई, शिरूर आणि आष्टी (Ashti) तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची दाहकता वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Breaking Marathi News)
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईची (Water Scarcity) भीषणता आतापासून जाणविण्यास सुरवात झाली आहे. बीड जिल्ह्यात देखील याची दाहकता अधिक जाणवत आहे. अनेक गावांमध्ये ट्रॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. बीड तालुक्यातील जवळपास 60 गावांचे टँकर प्रस्ताव प्रशासनाकडे आतापर्यंत आले असून, गेवराई तालुक्यातील 40 गावांचे प्रस्ताव येण्याचा (Water Crisis) अंदाज आहे. तर माजलगाव तालुक्यातून अन अंबाजोगाई 5, परळी 5, केज 4, धारूर 3, शिरूर कासार 10, आष्टी 5 व पाटोदा तालुक्यातून 8 प्रस्ताव येण्याचा अंदाज आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बीड जिल्ह्यात पाणी टंचाई जनविण्यास सुरवात झाली असून ही दाहकता अधिक वाढण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. यात पुढील महिन्याच्या शेवटी वाढ होण्याचा अनुमान आहे. त्यानुसार पाहणी करून परिस्थितीनुसार टँकर मंजुरीबाबत निर्णयाची कार्यवाही होणार आहे; अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.