Tiger Attack : मोहफूल घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ल्या; महिलेचा मृत्यू

Bhandara News : भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कन्हाळगाव येथील सीताबाई दडमल (वय ६०) ही महिला गावाशेजारी असलेल्या शेतात सकाळी मोहफुल संकलन करण्यासाठी गेली होती.
Tiger Attack
Tiger AttackSaam tv

शुभम देशमुख 

भंडारा : शेतशिवार परिसरात मोहफूल घेण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. (Tiger) वाघाच्या हल्ल्यात ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील (Bhandara) कन्हाळगाव परिसरात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घाबरत पसरली आहे. (Maharashtra News)

Tiger Attack
Jalgaon News : धुळवडीचा उत्साह क्षणात विरला; रंगपंचमी खेळून आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील कन्हाळगाव येथील सीताबाई दडमल (वय ६०) ही महिला गावाशेजारी असलेल्या शेतात सकाळी मोहफुल संकलन करण्यासाठी गेली होती. सकाळपासून गेलेली सीताबाई दुपार होऊन देखील घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी त्यांचा शोध घेण्यासाठी शेतात गेले.  शेतात जाऊन पाहिले असता (Tiger Attack) वाघाने तिच्यावर हल्ला करत जागीच ठार केले होते. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असुन नागरिकांनी एकच गर्दी केली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Tiger Attack
Pune Cyber Crime : पुण्यातील डॉक्टराची एक कोटीत फसवणूक; कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची दाखविली भीती

सदर घटनेमुळे कन्हाळगाव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेबाबत पोलीस प्रशासन तसेच (Forest Department) वन विभागाला माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच वन विभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा; अशी मागणी आता गावकरी करू लागले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com