Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation : मराठा समाजानंतर आता धनगर समाजाचेही मुंबईत होणार आंदोलन; १७ फेब्रुवारीला बीडमध्ये होणार इशारा मेळावा

विनोद जिरे

बीड : आरक्षणावर निर्णय होत नसल्याने मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघाला आहे. यानंतर आता (Dhangar Reservation) धनगर समाज देखील आक्रमक झाला असून 'चलो मुंबई'ची हाक दिली आहे. याकरिता (Beed) बीडमध्ये ११ फेब्रुवारीला इशारा मेळावा घेण्यात येणार आहे.  (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापलेला आहे. सरकारकडून निर्णय घेतला जात नसल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईला आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा समाजाचे मुंबईचे आंदोलन अद्याप झाले नसताना धनगर समाजाने देखील चलो मुंबईची हाक दिली आहे. याकरिता बीडमध्ये ११ फेब्रुवारी रोजी इशारा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यानंतरही सरकारने आरक्षणाविषयी निर्णय घेतला नाही; मुंबईला (Mumbai) आंदोलन करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तर आरक्षण दिंडी 

इशारा मेळाव्यांपर्यंत निर्णय झाला नाही तर  १७ फेब्रुवारीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या चौंडी या जन्मगावातून आरक्षण दिंडी मुंबईकडे काढण्यात येणार आहे. २२ फेब्रुवारीला मुंबई येथे पोहोचून आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी बीडमध्ये दिली आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी सरकार टीका देखील केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT