Mobile Theft
Mobile TheftSaam tv

Mobile Theft : दुचाकीवरुन येत मोबाईल चोरी; चोरटे पोलिसांच्या ताब्यात

Nashik News : दुचाकीवर येत रस्त्याने जात असलेल्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जात असल्याचे प्रकार मालेगावात मोठ्या प्रमाणात वाढले होते.
Published on

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या मालेगाव शहरात धूम स्टाईलने दुचाकी वरुन येत मोबाईल हिसकावून पोबारा केला जात होता. अशा प्रकारे मालेगावात (Malegaon) टोळी सक्रिय झाली होती. पोलीस यांच्या मागावर असताना चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

Mobile Theft
Shambhuraj Desai : सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक; शंभूराज देसाई यांची आंदोलन स्थगित करण्याची जरांगे पाटलांकडे विनंती

दुचाकीवर येत रस्त्याने जात असलेल्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून जात असल्याचे प्रकार मालेगावात मोठ्या प्रमाणात वाढले होते. ही टोळी सक्रीय असतांना पोलिसांसमोर (Police) मोबाईल चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. धूम स्टाईलने येत मोबाईल चोरीच्या तीन घटना एकाच वेळी दाखल झाल्याने पोलिसही सक्रीय झाले होते. त्यांनी काही तासातच या मोबाईल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mobile Theft
Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; महिलेची १० लाखात फसवणूक

तीन दुचाकींसह १६ मोबाईल जप्त 

दरम्यान छावणी पोलिसांनी मोबाईल चोरट्यांना पकडण्याचे मिशन हाती घेतले. यानंतर अवघ्या काही तासातच तीन दुचाकीसह १६ मोबाईल जप्त करत पाच जणांच्या टोळीला ताब्यात घेत कारवाई केली आहे. ही कारवाई झाल्याने अन्य पोलिस ठाण्यात देखील अशी मोहिम राबवावी अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com