Cyber Crime : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष; महिलेची १० लाखात फसवणूक

Jalgaon News : २८ नोव्हेंबरला यांना त्यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या चार मोबाईल धारकांनी फोन करून ॲपेक्स कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीतून नफा मिळवून देतो
Cyber Crime
Cyber CrimeSaam tv
Published On

जळगाव : शेअर बाजारात गुंतवणूक करून फायदा करून देण्याचे आमिष दाखवत जळगाव शहरातील एका महिलेची ९ लाख ८२ हजार रुपयात ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) झाल्याचा प्रकार (Jalgaon) समोर आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  (Tajya Batmya)

Cyber Crime
Girish Mahajan News : राज्यभर फिरवून लोकसभेची एक जागा निवडून दाखवावी; गिरीश महाजनांचे संजय राऊतांना आव्हान

जळगाव शहरातील विद्युत कॉलनी परिसरात वास्तव्यास असलेल्या दीपाली मकरंद चौधरी (वय ३३) यांची फसवणूक झाली. दीपाली चौधरी या २८ नोव्हेंबरला यांना त्यांच्या मोबाईलवर वेगवेगळ्या चार मोबाईल धारकांनी फोन करून ॲपेक्स कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीतून नफा मिळवून देतो; असे सांगत (Cyber Crime) ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले. यावरून शेअर खरेदीसाठी ऑनलाइन पद्धतीने ९ लाख ८२ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात मागवून घेतले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cyber Crime
Shambhuraj Desai : सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावर सकारात्मक; शंभूराज देसाई यांची आंदोलन स्थगित करण्याची जरांगे पाटलांकडे विनंती

गुंतवणुक केल्यावर सदर महिलेला ठरल्याप्रमाणे शेअर्सचे दर वाढून दुप्पट नफ्याची अपेक्षा हेाती. मात्र, नफा तर मिळालाच नाही, पण मुद्दलची रक्कम देखील न देता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर दीपाली चौधरी यांनी  १६ डिसेंबरला सायबर पोलिसात तक्रार देत चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com