Beed Parali News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: संतापजनक..परळीत मृतदेहाची अवहेलना; रेल्वे क्रॉसिंगवर आढळलेला मृतदेह नेला कचऱ्याच्‍या घंटागाडीत

संतापजनक..परळीत मृतदेहाची अहवेलना; रेल्वे क्रॉसिंगवर आढळलेला मृतदेह नेला कचऱ्याच्‍या घंटागाडीत

विनोद जिरे

बीड : दिग्गज नेत्यांच्या परळीतून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. परळी (Parali) शहरातील बरकतनगर रेल्वे क्रॉसिंगवर अवयव तुटलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. हा मृतदेह नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्‍याचा (Beed News) धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. (Live Marathi News)

परळीतील बरकतनगर रेल्‍वे क्राॅसिंगवर तब्बल ३ तास मृतदेहाचे अवयव हे रेल्वे पटरीवर पडून होते. मात्र उशिराने जाग आल्यानंतरही नगर पालिकेकडून मृतदेहाची अहवेलना करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे परळी शहर अन्‌ परिसरात कुणी आत्महत्या केली अथवा अपघात झाला; तर अशाच स्वरूपात कचऱ्याच्या घंटागाडीतून मृतदेह रुग्णालयात नेण्यात येत असल्‍याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे.

रेल्‍वे दोन तास थांबली

हैदराबाद- औरंगाबाद रेल्वेसमोर (railway) आल्याने आज सकाळी साडेसहा वाजेच्‍या सुमारास परळी येथील प्रियदर्शनी बँकेत कॅशिअर म्हणून काम करणारे शिवाजी श्रीपती कुटे (वय ४५, रा. कुटेवाडी ता. बीड) हे जागीच ठार झाले. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या मृतदेह छिन्न विच्छिन्न अन्‌ अवयव तुटलेल्या अवस्थेत रेल्वे पटरीवर पडून होता. यामुळे परळी मिरज रेल्वे दोन तासापासून अधिक उशीर होऊन स्थानकात थांबली.

अन्‌ कचरा गाडीत टाकला मृतदेह

अपघात होऊन देखील रेल्वे पोलिसांनी मृतदेहावर साधा कपडाही टाकला नाही. त्यानंतर सकाळी साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नगरपालिकेचे काही कर्मचारी त्या ठिकाणी गेले आणि मृतदेहाचे अवयव गोळा करून त्यांनी एका कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाडीतून हा मृतदेह परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणला.

नेत्‍यांच्‍या परळीत असे का?

दरम्यान परळी ही दिग्गज नेत्यांची म्हणून ओळखली जाते. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि आता सुषमा अंधारे यांचे राजकारण परळीतून सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून परळी नगरपालिकेवर धनंजय मुंडे यांची एकहाती सत्ता आहे. मात्र विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या मुंडे बहीण भावांच्या परळीत मृतदेहाची अशी अहवेलना होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळं आतातरी महाराष्ट्रभर फिरणाऱ्या परळीतील दिग्गज नेत्यांना जाग येणार का? मेल्यानंतर होणारी ही मृतदेहाची अहवेलना थांबणार का? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT