Nashik News: कांदा पिकला, कर्जफेडीची विंवचना कायम; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

कांदा पिकला कर्जफेडीची विंवचना कायम; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
Nashik News Farmer
Nashik News FarmerSaam tv

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : सततची नापिकी यातून कर्जाचा वाढत असलेल्‍या कर्जाचा बोजा. कर्जफेडीच्‍या (Nashik) विंवचनेत असलेल्‍या वडगाव (ता. येवले) येथील शेतकऱ्याने (Farmer) आत्‍महत्‍या केली. (Breaking Marathi News)

Nashik News Farmer
Nandurbar News: लघु प्रकल्पांनी गाठला तळ; धरणातील साठा कमी झाल्याने पाणीटंचाईची शक्यता

नाशिकच्या येवला तालुक्यातील वडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी भाऊसाहेब दामू वाल्हेकर (वय ५८) असे शेतकऱ्याचे नाव आहे. भाऊसाहेब वाल्‍हेकर हे गेल्या काही दिवसांपासून सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विवंचनेत होते. याला कंटाळून घराच्या जवळच असलेल्या एका शेततळ्यात त्‍यांनी काल रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nashik News Farmer
IPL Cricket Betting: आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा; बेटिंग करणाऱ्या ६ बुकी पोलिसांच्‍या ताब्‍यात

कांदा पिकला परंतु..

मयत शेतकरी भाऊसाहेब वालेकर यांच्यावर येवल्यातील एका राष्ट्रीयकृत बँकेचे पीक कर्ज होते. तसेच हात उसनवारीचे काही कर्ज होते. शेतात पिकून ठेवलेला कांद्याला कवडीमोल भाव असल्याने कांदा (Onion) त्यांनी साठवून ठेवला होता. मात्र भाव वाढण्याची कोणतीही अपेक्षा दिसत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे; अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com