Jalgaon News: सकाळी उठवायला गेलेल्‍या आईला बसला धक्‍का; आईला उद्देशून चिठ्ठी लिहत तरुणाने संपविले जीवन

सकाळी उठवायला गेलेल्‍या आईला बसला धक्‍का; आईला उद्देशून चिठ्ठी लिहत तरुणाने संपविले जीवन
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv

जळगाव : शहरातील शिवकॉलनी परिसरात २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Jalgaon) केली. अक्षय विलास सूर्यवंशी असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्‍महत्‍या करण्यापुर्वी अक्षयने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. (Latest Marathi News)

Jalgaon News
IPL Cricket Betting: आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा; बेटिंग करणाऱ्या ६ बुकी पोलिसांच्‍या ताब्‍यात

जळगावातील शिवकॉलनी परिसरात वास्‍तव्‍यास असलेल्‍या अक्षय सूर्यवंशी हा खासगी कंपनीत आणि मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी (२३ मे) रात्री दहाला जेवण करून झोपला होता. मध्यरात्री त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. हा प्रकार बुधवारी (ता. २४) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. मुलगा अक्षयला पाहताच आईने हंबरडा फोडत आक्रोश केला. मृताच्या पश्चात आई मालतीबाई आणि मोठा भाऊ ओम असा परिवार आहे.

Jalgaon News
Nashik News: कांदा पिकला, कर्जफेडीची विंवचना कायम; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

अजून त्रास नको...

आत्महत्या करण्यापूर्वी अक्षयने चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्‍याने 'शिक्षण झालं, पण घरच्यांच्या अपेक्षा, स्वप्न पूर्ण नाही करु शकलो. ओझं झालोय मी, अजून त्रास नाही देऊ शकत, म्हणून मी जातोय, कोणाला जबाबदार धरू नये.’ असा उल्‍लेख सुसाईड नोटमध्‍ये केलेला आहे. पोलिसांनी चिठ्ठी हस्तगत केली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com