Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ; साईराम मल्टिस्टेटच्या सर्वच शाखा एकाच वेळी बंद

Beed News : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात तब्बल २० शाखा असलेल्या (Beed) साईराम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्या आहेत. यामुळे या सोसायटीत ठेवी ठेवलेल्या ठेवीदारामध्ये खळबळ उडाली आहे. सदरची माहिती समजताच ठेविदारांनी मोठ्या संख्येने (Bank) बँकेच्या समोर गर्दी केली आहे. (Latest Marathi News)

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब मल्टिस्टेट परिवर्तन मल्टिस्टेट किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. या घोटाळ्यांमुळे पतसंस्था बंद झाल्या आहेत. यानंतर बीड शहरातील माळीवेस भागात मुख्य शाखा असलेल्या साईराम अर्बन या पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखांमध्ये हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आहेत. अशात सर्व शाखा बंद असल्याने ठेवीदारांमध्ये घाबरत पसरली आहे. यामुळे ठेवीदारांनी मुख्य शाखेसमोर गर्दी केली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गर्दी झाल्याने रोकड देण्यास अडचण 

बँकेचे व्यवस्थापक साईनाथ परभणी यांनी ठेवीदारांनी विश्वास ठेवावा. एकही रुपया ठेवणार नाही. ठेवीदाराने एकाच वेळी गर्दी केल्याने रोकड देण्यात अडचण निर्माण होत असल्याने, थोडा वेळ देण्याचे  आवाहन केले आहे. मात्र बँक बंद असल्याने ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी, लंच ब्रेकमध्ये अभ्यास, तिसऱ्या प्रयत्नात UPSC त पहिला; IAS प्रदीप सिंह यांची सक्सेस स्टोरी

Maharashtra Rail Update: केंद्राचा महाराष्ट्राला गीफ्ट, दोन रेल्वे प्रकल्पांना मंजूरी, शेतकऱ्यांना होणार फायदा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT