संजय राठोड
यवतमाळ : चायनिज मांजावर बाजारात विक्रीस बंदी आहे. असे असतानाही यवतमाळ शहरात सर्रास विक्री होत आहे. हा मांजा अनेकांच्या (Chinese Manja) जीवावर बेतत आहेत. दरम्यान मांज्यामुळे ५ वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरला गेल्याची घटना (Yavatmal) यवतमाळच्या नागपुर रोड ते बँक चौक रस्त्यावर घडली. जैन रफिक मवाल असे या चिमुकल्याचे नाव आहे. दुचाकी चालकाच्या सावधानतेने गाडीला ब्रेक दाबल्यामुळे तो थोडक्यात बचावला. परंतु, गळ्यावर मात्र चिर पडली असून गंभीर दुखापत झाली. (Breaking Marathi News)
सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने रफिक जैन हा काका वसिम मवाल यांच्यासोबत दुचाकीवर समोर बसून मार्केटमध्य जात होता. दरम्यान यवतमाळच्या नागपुर रोड वरून स्टेट बँक चौकाकडे जात असताना गणेश चौकात नायलॉनचा मांजा उडून दुचाकीवर आला आणि समोर बसलेल्या जैंनच्या गळ्याला अडकला. गाडीचा वेग मध्यम असल्याने मांजा समोरून गळ्याला अडकला. त्यामुळे यात जैनचां गळा चिरला गेला. गाडीचा वेग अधिक असता तर हा मांजा जीवावर बेतला असता. परंतु, थोडक्यात निभावले गेले. ही बाब वसिम यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीचा ब्रेक मारून जागेवरच थांबवली. जैनच्या गळ्याला जखम खोल आणि त्यातून रक्तस्त्राव अधिक होत असल्याचे त्याला लागलीच खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गेल्या काही वर्षांपासून चायनीज मांज्यावर बंदी आहे. वनविभागाला असे मांजा दिसल्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. परंतु, त्यावर कोणीही कारवाई करीत नसल्याने सर्रास दुकानांवर मांजे विक्रीला आहे. मकरसंक्रांत जवळ येत असून, पतंग उडविण्यासाठी मुले मांजे विकत घेत आहेत. त्यात चायनीज मांजा अत्यंत घातक असतो. त्याने गळा काही क्षणात चिरला जातो. सदर घटनेचे गांभीर्य पाहता संबधित विभागाने यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.