Rohit Pawar : 'राज्यात दुष्काळ, शासन आपल्या दारी हे नाटक बंद करा', रोहित पवार सरकारवर कडाडले

Rohit Pawar On Shasan Aplya Dari : 'राज्यात दुष्काळ, शासन आपल्या दारी हे नाटक बंद करा', रोहित पवार सरकारवर कडाडले
Mla Rohit Pawar, CM Eknath Shinde
Mla Rohit Pawar, CM Eknath ShindeSaam TV
Published On

Rohit Pawar On Shasan Aplya Dari :

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या यात्रेचा आज बीड जिल्ह्यातील दुसरा दिवस असून यादरम्यान त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घनाघात करत सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

आज बीड जिल्ह्यासह राज्यात दुष्काळ आहे. मात्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे नेमके कुठे आहेत? हे कुणालाच माहीत नाही. सरकारने शासन आपल्या दारी हे नाटक बंद करून लोकांच्या अडचणी जाणून घेत, त्यावर उपाययोजना काढाव्यात, असं म्हणत शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरून रोहित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ते बीडच्या थेरला येथे बोलत होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mla Rohit Pawar, CM Eknath Shinde
Mumbai Airport: मुंबई विमानतळाने पुन्हा रचला इतिहास, एका दिवसात दिली तब्बल 'इतक्या' लाख प्रवाशांना सेवा

यावेळी आमदार रोहित पवार बोलताना म्हणाले, की शेतकऱ्यांना एवढ्या अडचणी असताना आपले कृषिमंत्री कुटे आहेत ? हे कुणालाच माहीत नाही. त्यांचं वक्तव्य देखील कुठे आलेलं नाही. ते या जिल्ह्याचे नेते असले. या राज्याचे कृषिमंत्री असले. तरीसुद्धा सुरुवातीला फक्त 40 तालुके दुष्काळाच्या यादीत घेतले होते. खरंतर दुष्काळ जाहीर करताना राज्याचा विचार सरकारने करायला पाहिजे होता. मात्र हे सरकार एवढं गोंधळलेलं आहे की, पहिल्यांदा 40 तालुक्याची यादी जाहीर होते. त्यामध्ये निकष वेगळी आहेत आणि लोकांचा रोष वाढल्यानंतर दुसरी यादी जाहीर केली जाते. या सरकारला नेमकं काय चाललंय? हे त्यांनाही कळत नाही.  (Latest Marathi News)

हे सरकार शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, असे म्हटलं होतं. मात्र नेमकं कसं करणार? हे त्यांनाही माहित नाही. विम्याचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे सरकारकडून मदत लवकर दिली गेली पाहिजे. नाहीतर शेतकरी पाच टक्के व्याजाने पैसे घेईल, मग त्यानंतर या पैशाचा उपयोग काय ? असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडेंवर घनाघात केला.

Mla Rohit Pawar, CM Eknath Shinde
Virat Kohli Wicket: अनलकी विराट! कमिन्सचा तो बॉल अन् १.३० लाख लोकांना शांत करणारा तो क्षण - Video

त्याचबरोबर येणाऱ्या 3 डिसेंबर रोजी परळी येथे होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमावरून सरकारवर देखील टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा होईल. मात्र त्यावेळी कितीही गाड्या त्यांनी पाठवल्या, कितीही आमिषे दाखवले, तरी मला नाही वाटत त्या ठिकाणी लोक जातील.

"शासन आपल्या दारी याचा स्पष्ट मराठीमध्ये अर्थ असा आहे, तो म्हणजे सामान्य लोकांच्या दारी हे शासन आलं पाहिजे". मात्र या सरकारमध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने सांगितलं म्हणून लोकांना शासनाच्या दारी नेलं जातंय. मोठ्या सभेमध्ये 15 कोटी रुपये खर्च केला जातो, तिथे मोठी भाषण केली जाते, मात्र हे लोकांना नकोय.

आज आशा सेविकांना जो काही पैसा जाहीर केलाय, तो मिळत नाही. पेन्शनच्या स्कीम वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे "सरकारने हे शासन आपल्या दारी नाटक बंद करावा आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या दारी जाऊन काय अडचण आहे? हे ऐकून मार्ग काढायला पाहिजे", असं म्हणत आमदार रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडत सरकारला सल्ला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com