Virat Kohli Wicket: अनलकी विराट! कमिन्सचा तो बॉल अन् १.३० लाख लोकांना शांत करणारा तो क्षण - Video

Virat Kohli Wicket: संघाचे तीन गडी बाद झाल्यानंतर विराट कोहलीने संघाची कमान सांभाळली. मात्र, अर्धशतक झाल्यावर तोही तंबूत परतला.
Virat Kohli
Virat Kohlitwitter
Published On

Virat Kohli Wicket:

विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेत आज रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत सुरु आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यास उतरली आहेत. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. संघाचे तीन गडी बाद झाल्यानंतर विराट कोहलीने संघाची कमान सांभाळली. मात्र, अर्धशतक झाल्यावर तोही तंबूत परतला. विराट बाद होताच भरमैदानात शांतता पसरल्याचे दिसून आले. (Latest Marathi News)

टीम इंडियाची पहिले तीन गडी स्वस्तात माघारी परतले. शुभमन गिल लवकर बाद झाला. रोहित शर्मा ४७ धावांवर बाद झाला. तर श्रेयस अय्यर अवघ्या ४ धावांवर बाद झाला.

संघाचे तीन गडी बाद झाल्यावर विराट कोहलीने केएल राहुलसोबत ६७ धावांची भागीदारी रचली. कोहली ५४ धावांवर बोल्ड झाला. विराट कोहली बाद झाला, त्यावेळी संघाच्या धावा १४८ झाल्या होत्या. विराट बोल्ड झाल्यानंतर मैदानावर एकच शांतता पसरली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Virat Kohli
World Cup 2023: सामना सुरु असताना अचानक चाहत्याची मैदानावर एन्ट्री, विराट कोहलीची गळाभेट घेतली अन्...

भारताची 'रनमशीन'

विराट कोहलीने विश्वचषकात धुव्वादार फलंदाजी केली आहे. विराटने या विश्वचषकाच्या स्पर्धेत ७६५ धावा केल्या आहेत. त्याने या स्पर्धेत ९५.६३ धावांच्या सरासरीने धावा केल्या आहेत.

तसेच या स्पर्धेत त्याने ६ अर्धशतके ठोकली आहेत. त्याचबरोबर तीन शतकेही ठोकली आहेत. महत्वाचं म्हणजे विराटने सेमीफायनलमध्ये शतक ठोकलं. तर आज अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकलं आहे.

विराट कोहलीने या विश्वचषकात ७०० हून अधिक धावा केल्या आहेत. विश्वचषकात ७०० हून अधिक धावसंख्या करणारा विराट कोहली हा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराटच्या नावावर एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सर्वाधिक ५० शतक ठोकण्याचा विक्रम आहे.

Virat Kohli
World Cup 2023: सुरूवातीला संघर्ष, सेकंड हाफमध्ये यश.. ज्योतिष्याचं मोठं भाकित; १० सामन्यांची भविष्यवाणी ठरलीयं खरी!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com