World Cup 2023
World Cup 2023Saam tv

World Cup 2023: सामना सुरु असताना अचानक चाहत्याची मैदानावर एन्ट्री, विराट कोहलीची गळाभेट घेतली अन्...

World Cup 2023: विराट कोहली मैदानावर फलंदाजी करत असताना एक चाहता मैदानावर आला.
Published on

World Cup 2023:

विश्वचषकाचा अंतिम सामना जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियम भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं आहे. टीम इंडियाचे तीन गडी बाद झाले आहेत. विराट कोहली मैदानावर फलंदाजी करत असताना एक चाहता मैदानावर आला. चाहता मैदानावर आल्याने काही काळ स्टेडियमवर तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली मैदानावर फलंजदाजी करत होता. त्याचवेळी नरेंद्र मोदी स्टेडियमची सुरक्षा व्यवस्था भेदून एक चाहता मैदानावर पोहोचला. या चाहत्याने विराट कोहलीची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला.

World Cup 2023
World Cup 2023: सुरूवातीला संघर्ष, सेकंड हाफमध्ये यश.. ज्योतिष्याचं मोठं भाकित; १० सामन्यांची भविष्यवाणी ठरलीयं खरी!

या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, मैदानात एक चाहता येतो. त्यानंतर हा चाहता थेट विराट कोहलीच्या खांद्यावर हात ठेवतो. मात्र, त्याचवेळी विराट कोहली त्याच्यापासून दूर जातो. त्यानंतर सुरक्षारक्षक या चाहत्याला मैदानाबाहेर घेऊन जातात.

World Cup 2023
IND vs AUS Final Match: रोहितचा मास्टरस्ट्रोक फसला? टॉप ३ फलंदाज स्वस्तात माघारी

सध्या सामन्यात टीम इंडियाची स्थिती काय?

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल ४, रोहित शर्मा ४७ आणि श्रेयस अय्यर फक्त ४ धावांवर बाद झाला. पहिले तीन फलंदाज स्वस्तात माघारी परतले आहेत.

तर विराट कोहलीही अर्धशतकानंतर बाद झाला. आता टीम इंडियाची धावसंख्या १५० पार झाल्या आहेत. टीम इंडियाने जिंकण्यासाठी कमीत कमी ३०० धावा केल्या पाहिजेत, असा सल्ला दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com