Beed Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Beed Lok Sabha : बीड लोकसभेच्या रिंगणात आता ४१ उमेदवार; १४ उमेदवारांची माघार

Beed News : बीड लोकसभा निवडणुकीसाठी ७४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. मात्र अर्जाची छाननी झाली तेव्हा १९ अर्ज बाद झाल्याने ५५ उमेदवार रिंगणात होते

विनोद जिरे

बीड : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारांच्या अर्ज दाखल व माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे (Beed) बीड लोकसभा मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले असून बीडसाठी निवडणुकीच्या रिंगणात आता ४१ उमेदवार असून १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता उमेदवारांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात देखील झाली आहे.

बीड लोकसभा निवडणुकीसाठी ७४ उमेदवारांनी ९९ अर्ज दाखल केले होते. मात्र अर्जाची छाननी झाली तेव्हा १९ अर्ज बाद झाल्याने ५५ उमेदवार रिंगणात होते. या दरम्यान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (Beed Lok Sabha) चार पक्षाच्या उमेदवारांसह १० अपक्ष अशा १४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रिंगणात ४१ उमेदवार आहेत. यामध्ये नोटांचा एक पर्याय असणार आहे. यासाठी एका बूथवर ३ ईव्हीएम लागणार आहे. २५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात २१ लाख ४२ हजार ५४७ मतदारांची नोंदणी झाली असून हे मतदार आपला खासदार निवडणार आहेत.

१३ मेस होणार मतदान 
दरम्यान बीड लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. मतदानासाठी अवघे १३ दिवस उरले आहेत. आता लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून ४१ उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात २ हजार ३५५ मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, यासाठी २५ ठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आलेले आहेत. त्यामध्ये माजलगाव ६, गेवराई ३, परळी ३, केज ४, आष्टी ६ आणि बीड ३ असे चेकपोस्ट आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उद्या बारामतीत येणार असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी वायुसेनेच विमान बारामती दाखल झालं

Gajra Hairstyles: मराठमोळ्या लूकसाठी केसांना गजरा लावण्याच्या 5 युनिक स्टाईल्स

Pinky Mali Death: 'बाबा, फ्लाईटमध्ये गेल्यावर मी अजित पवारांशी...'; पण 'ते' वचन अखेरचं ठरलं, पिंकी मालीचं कुटुंबासोबत शेवटचं काय बोलणं झालं?

Maharashtra Closed : राज्यातील 'ही' शहरे राहणार बंद! वाचा नेमकं कारण काय?

Ajit Pawar Death: अजित पवारांचा अकाली मृत्यू, बारामती हळहळली, कार्यकर्त्यांचा डोळ्यात अश्रू | VIDEO

SCROLL FOR NEXT