Bajarang Sonwane  Saam Tv
महाराष्ट्र

Beed News : अजित पवार गटाला धक्का; बजरंग सोनवणे यांचा सदस्यत्वाचा राजीनामा, सोशल मीडियावर केला पोस्ट

Beed News : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली होती

विनोद जिरे

बीड : महाविकास आघाडीकडून बीड लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून ज्यांचे नाव चर्चेत आहे. त्या (Beed) बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केला आहे. यामुळे अजित पवार (Ajit Pawar) गटाला धक्का बसला आहे. (Tajya Batmya)

राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे हे अजित पवार यांच्यासोबत गेले होते. यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली होती. याशिवाय जिल्हा परिषदचे सभापती म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. यासह कारखानदारीमध्ये देखील त्यांचे नाव आहे. यामुळे त्यांचे नाव विविध क्षेत्रात देखील घेतलं जाते. दरम्यान बजरंग सोनवणे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोडचिट्टी दिलेल्या बजरंग सोनवणे यांच्या उमेदवारीवर आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता 

गेल्या अनेक दिवसांपासून बजरंग सोनवणे हे राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे म्हणजेच मविआचे (Mahavikas Aaghadi) उमेदवार असू शकतात? असा तर्कवितर्क लावला जात होता. दरम्यान आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला असून आज ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाळासाहेब एरंडे उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

Solapur : शेताच्या बांधावरून वाद; शेतकऱ्याने रागातून २०० केळीची झाडे केली उध्वस्त

Cough Syrup: जीवघेण्या कफ सिरफ कंपनीच्या मालकाला अखेर अटक, औषधामुळे २० मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT