Amalner News : नोकरीच्या आमिषाने दोन लाखात फसवणूक; तरुणाने संपविले जीवन

Jalgaon News : अमळनेर तालुक्यातील देवळी येथील सागर संजय बैसाणे हा २०२१ मध्ये म्हैसाळ (जि. सांगली) येथे मानसी करियर अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता.
Amalner News
Amalner NewsSaam tv
Published On

अमळनेर (जळगाव) : सैन्यात नोकरी लावून देण्याचे आमिष देत दोन लाख रुपये घेतले होते. दिलेली हि (Jalgaon) रक्कम परत न मिळत नव्हती शिवाय नोकरी देखील मिळाली नाही. या तणावातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना (Amalner) देवळी (ता, अमळनेर) येथे घडली आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

Amalner News
Akola Crime: दीराच्या प्रेमात वहिनी वेडावली; नवऱ्याचा अडसर कायमचा दूर केला, बनाव रचला पण एका पुराव्यानं फसला!

अमळनेर तालुक्यातील देवळी येथील सागर संजय बैसाणे हा २०२१ मध्ये म्हैसाळ (जि. सांगली) येथे मानसी करियर अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. त्यावेळी तेथील प्रशिक्षक सुशांत सुनील उबाडे, अकादमीचे संस्थापक अनिल भरत कांबळे, महादेव विलास सातपुते यांनी ७ एप्रिल २०२२ रोजी सागर याला सैन्य दलाच्या ‘बीआरओ’मध्ये नोकरीला लावण्यासाठी साडेसहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी (Fraud) सागरने त्यांना एक लाख रुपये दिले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amalner News
Washim News : ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने ४० जनावरांना विषबाधा

कॅंटीनमध्ये मजूर म्हणून दिले काम 

दरम्यान ऑक्टोबर २०२२ मध्ये सुशांत उबाळे याने पुन्हा एक लाख रुपयांची मागणी केली. तिघांनी सागर याला सरकारी नोकरी न देता कॅन्टीनमध्ये मजुरीला लावून दिले. सागर याने दिलेले दोन लाख रुपये परत मागितले असता त्यांनी नकार दिला. म्हणून वैतागून सागर याने रेल्वे खाली झोकून देत आत्महत्या केली. या प्रकरणी सागरचे काका सुभाष बैसणे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, पोलीलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com