बीड जिल्ह्यात तृतीयपंथीयासह चौघांनी तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला.
काम देण्याचे आमिष दाखवून हैद्राबादच्या २० वर्षीय तरुणीला फसवले.
अस्वलआंबा येथील मंदिराजवळील खोलीत घटना घडली.
पोलिसांनी पीडितेची सुटका करून तिघांना अटक केली, तृतीयपंथी आरोपी फरार.
बीडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच बीडमधून खळबळजनक आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. काम देण्याची भुलथाप देत एका तृतीयपंथीयानं भयानक कृत्य केलं. एका २० वर्षीय तरूणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केलं. नंतर आळीपाळीने तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी तृतीयपंथीयासह चौघांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील पीडिता (वय वर्ष २०) मुळची हैद्राबाद येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. ती मुंबईत घरगुती साफसफाईच्या कामावर होती. पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ती मुंबईहून हैद्राबादला जाण्यासाठी रेल्वेने निघाली होती. भूक लागल्याने ती परळीत उतरून एका हॉटेलमध्ये जेवत असताना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची नजर तिच्यावर पडली.
पुजाने तिच्याकडून तिचीच माहिती काढून घेत तिची गरज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तृतियपंथीयानं तिला काम देण्याची भुलथाप दिली. त्यानंतर पूजाने सतीश अण्णासाहेब मुंडे (रा. डाबी, ता. परळी) आणि मोहसीन सरदार पठाण (रा. शिवाजीनगर, परळी) या दोघा साथीदारांना बोलावून घेतले.
त्यानंतर ते तिघे पिडीतेला मोटारसायकलवर बसवून अस्वलआंबा येथील भागवत अंगद कांदे या चौथ्या साथीदाराकडे घेऊन गेले. तिथे एका मंदिराशेजारी असलेल्या भागवत कांदे याच्या मालकीच्या खोलीमध्ये घेऊन गेले. नंतर जीवे मारण्याची धमकी देत तिला मारहाण केली. नंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने जबरदस्ती करत बलात्कार केला.
दरम्यान, गावात सुरु असलेल्या या घृणास्पद प्रकाराची माहिती एका सजग नागरिकाने शनिवारी पहाटे डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना माहिती दिली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण ठाण्याचे सहा. फौजदार टोले यांनी अस्वलआंबा गाठले आणि पिडीतेची सुटका केली. यावेळी पोलिसांना पाहताच पूजाने घटनास्थळाहून पळ काढला. मात्र सतीश मुंडे, मोहसीन पठाण आणि भागवत कांदे यांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.