बीड : महाराष्ट्र शासन जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आयोजित ऑनलाइन युवा महोत्सवातील स्पर्धेवरून बीडमध्ये काहीसा गोंधळ उडालाय. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी महाविद्यालयीन प्राध्यापकास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय. तर या शिवीगाळीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालीय. यामुळं जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात खळबळ उडालीय.
हे देखील पहा :
तर याविषयी बीडमध्ये (Beed) जानेवारीला जिल्हास्तरावरील ऑनलाइन युवा महोत्सवाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा लोकनृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता. त्यामुळं औरंगाबाद (Aurangabad) येथे विभागीय लोकनृत्यस्पर्धेसाठी आमचा क्रमांक आला होता. ही स्पर्धा काल 5 जानेवारीला झालीय आहे. आतापर्यंत या स्पर्धेचा निकाल आला नाही. मात्र बीडमधील काही कलाकारांना याचा निकाल माहीत झालाय.
याविषयी मी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांना फोनवरून विचारणा केली. मात्र यावेळी त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नाही. उलट ते म्हणाले की त्या दोन्ही महाविद्यालयांनी चांगलं सादरीकरण केलं. त्यामुळे त्यांचा नंबर आला. असा आरोप प्राध्यापक विनोद दळवी यांनी केला आहे. त्याचबरोबर पुन्हा फोन लावून विचारलं असता, त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. यामुळे मी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. मात्र वरिष्ठांनी योग्य ती कारवाई न केल्यास, मी कायदेशीर लढा देणार आहे.असं प्राध्यापक विनोद दळवी म्हणाले.
तर या विषयी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांना विचारलं असता, ते म्हणाले की ही स्पर्धा बीडमध्ये झाली नाही. मात्र पुन्हा शिवीगाळ संदर्भात विचारले असता, क्रीडा अधिकारी म्हणाले की, असं काही झालं असेल तर ते आमचं वयक्तिक आहे. लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतो, त्यामुळं हे आमचं वैयक्तिक आहे. असं म्हणून त्यांनी यावर बोलणं टाळलं.
दरम्यान, प्राध्यापक विनोद दळवी यांनी ज्यावेळेस जिल्हा क्रीडा अधिकारी यांना फोन केला, त्यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक अरेरावी झाली. मात्र त्यानंतर क्रीडा अधिकाऱ्यांनी थेट अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याने. कला क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता यावर वरिष्ठ काय कारवाई करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.