नायलॉन मांजाची ऑनलाईन विक्री करणाऱ्या Shop Clues साईटवर पोलिसांची कारवाई!

प्रतिबंधित नायलॉन मांजा ची ऑनलाइन विक्री थांबविण्यासाठी नागपूर पोलिसांनी ऑनलाईन मांजा विकणाऱ्या ई-कॉमर्स वेबसाईटवर केली कारवाई...
Nylon Manja
Nylon ManjaSaam Tv
Published On

नागपूर : संक्रांतीच्या सणात पतंग उडविण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. मात्र, गेल्या काही दिवसात पतंगबाजी मध्ये विकृतता आणण्याचा प्रयत्न केला जात असून अनेक लोक प्रतिबंधित नायलॉन मांजा ने पतंग उडवितात. नायलॉन मांजा पर्यावरणासाठी देखील हानीकारक असून मानवासहित पशु पक्ष्यासाठी देखील धोकादायक आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठाने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

हे देखील पहा :

नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) या संदर्भात रोज कारवाई केली जात असून करवाइ दरम्यान ऑनलाइन देखील नायलॉन मांजा ची डिलीव्हरी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली शॉप क्लुज (Shop Clues) नावाच्या वेबसाईटवरून पोलिसांनी ऑनलाइन मांजा मागवत खात्री करत शॉप क्लुज वेबसाईटच्या मॅनेजर नागपूरच्या (Nagpur) सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

Nylon Manja
अडीच कोटींच्या हारवेस्टरपायी शेतकऱ्यांनी विकली 17 एकर जमीन; कंपनीकडून फसवणूक!

नायलॉन मांजा ने पतंग उडविताना अनेक वेळा रस्त्यावरून जाणारे निष्पाप नागरिक जखमी झाले तर अनेक लोकांचा या मांजामुळे मृत्यू देखील झाला आहे, सोबतच पशु पक्षी देखील नायलॉन मांजा मुळे मृत झाल्याचं निदर्शनास आल आहे. नायलॉन मांजा नष्ट होत नसल्याने पर्यावरणासाठी देखील हानिकारक आहे. त्यामुळे पोलीस कारवाई करतील मात्र, आता नागरिकांनी आपली हौस भागविण्यासाठी निष्पाप लोकांच्या जीवावर उठण कितपत योग्य आहे याचा देखील विचार करणं आवश्यक झालं आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com