-- राजेश भोस्तेकर
रायगड : शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे तीन आरोपींना चांगलेच महागात पडले आहे. आपले कर्तव्य बजावत असलेल्या तलाठ्याला आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली होती. याप्रकरणी अलिबाग (Alibag) सत्र न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा (Punishment) सुनावली असून दंडही ठोठावला आहे. १९ फेब्रुवारी २०१८ रोजी अलिबाग रोहा रोडवर वावे वळवली बस स्टॉपच्या दरम्यान ही घटना घडली होती.
हे देखील पहा :
मातीने भरलेले चार ट्रक तलाठी कमलाकर गायकवाड आणि तलाठी सुदर्शन सावंत यांनी थांबवून कायदेशीर कारवाई करत होते. यावेळी आरोपी सुधीर धर्मा चेरकर, हेमंत दशरत चेरकर, मनिष नथुराम पाटील यांनी तलाठी कमलाकर गायकवाड शिविगाळी करून काठीने मारहाण (Beating) केली होती. या प्रकरणी त्या तिघांविरोधात भादंवि कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अन्वये रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाची सुनावणी तदर्थ जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात (Court) झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून स्मिता राजाराम धुमाळ यांनी काम पाहीले. सुनावणी दरम्यान एकूण आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात फिर्यादी कमलाकर गायकवाड, साक्षीदार सुदर्शन सावंत, तहसिलदार प्रकाश संकपाळ, वैद्यकीय अधिकारी शितल जोशी, पंच शेखर बळी आणि तपासित अमंलदार जी पी म्हात्रे यांच्या साक्षी महत्वपुर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर तिनही आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले. आणि एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच दंडही ठोठावला.
Edited By : Krushnarav Sathe