Beed district Prohibitory order Saam TV
महाराष्ट्र

Beed News : मोठी बातमी! बीड जिल्ह्यात १५ जूनपर्यंत मनाई आदेश लागू; पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

Beed Breaking News : बीड जिल्ह्यात येत्या १५ जूनपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी हा निर्णय घेतला आहे.

विनोद जिरे

बीड जिल्ह्यात येत्या १५ जूनपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ यांनी हे आदेश जारी केले आहे. येत्या ४ जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. यामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

रविवार २ जून २०२४ रोजी मध्यरात्रीपासून या मनाई आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. १५ जून मध्यरात्रीपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन नये. तसेच मिरवणुका, मोर्चे तसेच उपोषण किंवा धरणे आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी कोणतेही शस्त्र, सोटे, काठी तसेच शरीराला इजा होणाऱ्या बाळगू नये, असं सांगण्यात आलं आहे. तसेच अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणतीही सोशल मीडियावर शेअर करू नये तसेच ती जवळ बाळगू नये, असं आवाहनही करण्यात आलं आहे.

नागरिकांनी जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, यासारखी कृत्ये टाळावी. जेणेकरून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी. असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी काढले आहेत.

बीडमध्ये कोण मारणार बाजी?

बीड लोकसभेची निवडणूक यंदा अतिशय रंगदार झाली. या मतदारसंघातून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीने बजरंग बाप्पा सोनवणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा राजकीय संघर्ष देखील पाहायला मिळाला. त्यामुळे कोणत्या पक्षाचा उमेदवार विजयी होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT