Rohit Pawar: 'किडलेल्या व्यवस्थेला बायपास सर्जरीची आवश्यकता'; पुणे पोर्शे कार अपघातावरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा

Rohit Pawar Criticized Government On Pune Porsche Accident: पुण्यातील पोर्शे कार अपघातावरून रोहित पवारांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी त्यांच्या X सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
 रोहित पवार
Rohit PawarSaam Tv

सागर आव्हाड, साम टीव्ही पुणे

पुण्यातील पोर्शे कार अपघातावरून रोहित पवार आक्रमक झाल्याचं दिसत आहे. या अपघातावरून त्यांनी X सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. किडलेल्या व्यवस्थेला बायपास सर्जरीची आवश्यकता अशी पोस्ट करत त्यांनी सरकारच्या व्यवस्थेवर घणाघात केला आहे. कल्याणीनगरमध्ये हा अपघात १८ मे रोजी रात्री झाला होता.

रोहित पवारांनी (Rohit Pawar) त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, कल्याणीनगरमध्ये दोन निष्पापांना गाडीखाली चिरडलं. त्यानंतर किडलेल्या संपूर्ण यंत्रणेचं पितळ उघड पडलं आहे. पोलीस विभागातील अधिकाऱ्यांचे, डॉक्टरांचे कारनामे देखील उघडकीस आले आहेत. आरटीओ आणि एक्साईज विभागावर देखील त्यांनी टीका केली आहे. बाल न्याय मंडळावर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.

दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला (Pune Porsche Accident) ‘निबंध’ लिहायला सांगून एका दिवसात मोकळं सोडलं. महापालिका इतरवेळी भाजीवाल्याकडूनही दंड वसूल करते. यावेळी मात्र घाऊक स्वरुपात हॉटेलांवर कारवाई केली. सामान्य कामगारांच्या नोकऱ्यांचा घोट घेतला, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. संपूर्ण व्यवस्था सडल्याचं हे लक्षण असल्याचा घणाघात त्यांनी केला आहे. इतरही सगळ्या विभागांमध्ये हेच सुरु असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं (Rohit Pawar Criticized Government) आहे.

 रोहित पवार
Rohit Pawar News: भाजप, शिंदे गट अन् राष्ट्रवादी, महायुतीत कोण किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी नेमका आकडा सांगितला!

सामान्य लोकांसाठी काम करणं अपेक्षित असलेली व्यवस्था केवळ पॉवरफुल लोकांसाठी काम करताना दिसते, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यामुळे सामान्य लोकांना दबाव आणावा लागणार (Rohit Pawar News) आहे. या किडलेल्या व्यवस्थेवर बायपास सर्जरी करावी लागणार असल्याची टीका त्यांनी केली आहे. आज त्या दोन मृतांना न्याय मिळण्याची शक्यता केवळ सामान्य लोकांच्या दबावामुळेच निर्माण झाल्याचं रोहित पवारांनी म्हटलं आहे.

 रोहित पवार
Rohit Pawar News: 'मतदानाचा परळी पॅटर्न', बीडमध्ये बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com