Rohit Pawar News: 'मतदानाचा परळी पॅटर्न', बीडमध्ये बुथ ताब्यात घेण्याचा प्रयत्न, रोहित पवारांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप; VIDEO
बीड, ता. १९ मे २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकांचे चार टप्प्यांतील मतदान पुर्ण झाले आहे. या मतदानादरम्यान पैसे वाटल्याचे, मतदारांना धमकावल्याचे गंभीर प्रकार समोर आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबत अनेक खळबळजनक आरोप केले होते. आता रोहित पवार यांनी बीडमध्ये धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंकडून बुथ ताब्यात घेण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केले असून यासंबंधी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे.
बीड लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान पार पडले. बीडमध्ये मतदानादरम्यान पैसे वाटल्याचे, मतदारांना धमकावल्याचे तसेच अनेक बुथ ताब्यात घेण्यात आल्याचे गंभीर आरोप विरोधकांकडून केले जात आहेत, अशातच रोहित पवार यांनी नवा व्हिडिओ ट्वीट करत बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे, तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
या व्हिडिओमध्ये काही नागरिक भारतीय जनता पक्षाकडून बुथ ताब्यात घेण्यात आल्याचा दावा करताना दिसत आहेत. बूथ ताब्यात घेऊन मतदान मारण्याचा हा नवा परळी पॅटर्न महाराष्ट्राला शोभत नाही. पंकजा ताई तुम्ही कदाचित यामध्ये सहभागी नसालही पण तुमचे बंधुराज कुठल्या पातळीला जाऊ शकतात हे कदाचित तुम्हालाही माहित नसेल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
"महाराष्ट्रासारख्या राज्यात असे प्रकार घडवून आणण्याची हिम्मत येतेच कुठून? असे प्रकार करण्याची गरज पडतेच का ? सत्तेतून ही हिम्मत येत असेल तर मग ही लोकशाहीसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे. निवडणूक आयोगाने स्थानिक मंत्री महोदयासह स्थानिक प्रशासनाची चौकशी करावी ही विनंती. निवडणूकआयोग किती दिवस बघ्याची भूमिका घेतं, हे बघुया," असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.