आयसीयूत रुग्णाला उंदरानं कुरतडलं? भाईंदरमध्ये आरोग्यव्यवस्था पोखरलेली

ICU Horror In Mira-Bhayandar: भाईंदरच्या महापालिका रुग्णालयातील आयसीयूत एका महिलेला उंदरानं कुरतडलं. या धक्कादायक घटनेनंतर रुग्ण महिलेचा काही तासांनी मृत्यू झालाय. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे कसे धिंडवडे निघालेत ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..
Rat Bite Allegation In Bhayandar Civic Hospital ICU Sparks Outrage After Ventilator Patient Dies
Rat Bite Allegation In Bhayandar Civic Hospital ICU Sparks Outrage After Ventilator Patient DiesSaam Tv
Published On

मिरा-भाईंदरच्या आरोग्य व्यवस्थेला आता उंदरांनीच पोखरलयं... कारण ज्या आयसीयूत सर्वसामान्य माणसाला प्रवेश नाकारला जातो... त्याचं आयसीयूत चक्क उंदरानं व्हेटिलेटरवर असलेल्या एका महिलेला कुरत़डलं आणि काही तासांनी त्याचं महिलेचा दुर्देवी मृत्यू झालाय..त्यामुळे भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातल्या या घटनेनं राज्यातील आरोग्य व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलय...

मात्र महिलेच्या मृत्यूआधी नेमकं काय घडलं पाहूयात...

सकाळी 6 वाजता आयसीयूत व्हेटिलेंटवर असलेलेल्या महिलेला उंदीर कुरतडत असल्याचं कुटुंबियांचं निदर्शनास आलं...त्यानंतर कुटुंबियांनी नर्स आणि डॉक्टरांना संबंधित घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिलं...मनसे कार्यकर्त्यांनीही घटनास्थळी धाव घेत रुग्णालय प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला... त्यानंतर रुग्णालयाचे डीन जाफर त़डवी यांनी संबंधित नर्स आणि डॉक्टरच्या चौकशीचे आदेश दिले...

खरतर पंडित भीमसेन जोशी रुग्णालय हे मिरा-भाईंदरमधील एकमेव मोठे सरकारी रुग्णालय आहे.इथे प्रत्येक रुग्ण विश्वासाने उपचारासाठी येतो, पण व्हेंटिलेटरवर असलेल्या वृद्ध महिलेला रात्रभर उंदीर चावा घेत असतील आणि महिलेचा मृत्यू होत असेल तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय... त्यामुळे रुग्णालयात स्वच्छतेच्या आणि सुरक्षेच्या कंत्राटावर खर्च होणारे कोट्यवधी रुपये नेमके कुठे जातात? राज्यातील सरकारी रुग्णालयाचा दर्जा नेमका कधी सुधारणार? भाईंदरमधील घटनेनंतर संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनावर कोणती कारवाई होणार? हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com