युद्धात अमेरिका एकटी पडली? ऐन युद्धात ट्रम्पना मोठा धक्का

Donald Trump Iran Conflict Nato Allies Step Back: इराणला हलक्यात घेऊन अमेरिकेनं जगाला युध्दाच्या खाईत लोटलंय. याच युद्धात आता अमेरिका एकटी पडणार आहे... नाटोमधील मित्रदेशांनीही अमेरिकेकडे कशी पाठ फिरवलीय ?पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Rising tensions between the United States and Iran as several NATO allies hesitate to support Washington’s military strategy in the Hormuz Strait.
Rising tensions between the United States and Iran as several NATO allies hesitate to support Washington’s military strategy in the Hormuz Strait.Saam Tv
Published On

इराणविरोधातील युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच कोंडी झालीये. इराणला गुडघे टेकण्यासाठी हाराकिरी करणाऱ्या अमेरिकेला जपानसह ऑस्ट्रेलिया आणि तुर्की या मित्रदेशांनीच खो दिलाय.. यामुळे जागतिक महासत्ता असलेला अमेरिका आता जागतिक स्तरावरच एकाकी पडताना दिसतोय. होर्मुझ सामुद्रधुनीत दबदबा निर्माण करणाऱ्या इराणला रोखण्यासाठी मित्रदेशही साथ द्यायला तयार नाहीयेत.

ट्रम्प यांनी विनंती केली असली तरी ऑस्ट्रेलिया होर्मुझ सामुद्रधुनीमध्ये युद्धनौका पाठवणार नाहीये. तर अमेरिकेचा नाटोमधील मित्रदेश तुर्कीने याआधीच हात झटकलेत. तसंच, होर्मुज सामुद्रधुनीत आपली युद्धनौका पाठवायची की नाही यावर दक्षिण कोरिया मात्र गांभीर्याने विचार करतोय. फक्त जपान, तुर्की आणि ऑस्ट्रेलियाच नाही, फ्रान्सनंही आपल्या युद्धनौका पाठवणार नसल्याचं सांगत ट्रम्प यांच्या मदतीचा विषय झटक्यात संपवलाय. मित्रांनी पाठ फिरवल्यानंतर ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्धात आता नाटो देशांना थेट इशारा दिलाय.

हा इशारा देत ट्रम्प यांनी एकप्रकारे नाटो देशांनाही इराणविरोधातील युद्धात ओढलंय. ह्या संघटनेत काही युरोपीय देशांचाही सहभाग आहे. इराणच्या आक्रमकतेमुळे अमेरिकेची याआधीच डोकेदुखी वाढलीय, जर होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाली नाही, तर केवळ नाटोच नाही संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडण्याची भीतीये. त्यामुळे इराणला हलक्यात घेऊन जगाला युध्दाच्या खाईत लोटणारी अमेरिका आता या युद्धात एकाकी पडली आहे एवढं नक्की

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com