Ajit Pawar on Pune Accident : पुणे पोलीस आयुक्तांना कॉल केलाच नाही; अजित पवारांनी आरोप फेटाळले

Ajit Pawar Reaction on Pune Porsche Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मी पोलीस आयुक्तांना फोन केलाच नाही, असं सांगत अजित पवार यांनी आरोप फेटाळून लावले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तांना कॉल केलाच नाही; अजित पवारांनी आरोप फेटाळले
Ajit Pawar Reaction on Pune Porsche CaseSaam TV

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरून राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आला, असा आरोप होत आहे. अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे पोलीस ठाण्यात गेले होते, त्यांनी आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय दबाव आणला होता. याशिवाय अजित पवार यांनी देखील पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन केला होता, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

पुणे पोलीस आयुक्तांना कॉल केलाच नाही; अजित पवारांनी आरोप फेटाळले
Pune Porsche Case : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण, डॉक्टरांनी बदललेले 'ते' रक्ताचे नमुने कुणाचे? मोठी माहिती उघड

अंजली दमानिया यांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं. मी पुणे पोलीस आयुक्तांना कॉल केलाच नाही, असं म्हणत अजित पवारांनी आरोप फेटाळून लावले. अपघातानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी कोणावरही दबाव आणला नाही, असंही ते म्हणाले.

मतदारसंघात एखादी घटना घडल्यास आमदार त्या ठिकाणी जातात, असे सांगत अजित पवार यांनी आमदार टिंगरे यांची पाठराखण केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात माध्यमांसोबत संवाद साधला, यावेळी कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातावर त्यांनी भाष्य केलं.

अजित पवार म्हणाले, "राज्य सरकार आणि पोलीस योग्य प्रकारे कारवाई करत आहेत. कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. आरोप करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. पण ही घटना घडल्यापासून चौकशीत जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होत आहे".

"अपघात प्रकरणाची माहिती मिळाली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री म्हणून मी चौकशीचे आदेश दिले. जसजशी चौकशी पुढे गेली, तसतसा या प्रकरणात अनेकांचा सहभाग दिसून आला. अल्पवयीन मुलाला जामीन हा न्यायालयाने दिला होता, त्यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नव्हती", असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

"अल्पवयीन मुलाला जे वाचवण्याचा प्रयत्न करीत होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चौकशीनंतर दोन पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरही दोषी आढळले असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. यापुढेही जे दोषी आढळतील, त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल", असंही ते म्हणाले.

पुणे पोलीस आयुक्तांना कॉल केलाच नाही; अजित पवारांनी आरोप फेटाळले
Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणात सर्वात मोठी अपडेट; अल्पवयीन आरोपीच्या आईला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com